प्रणिती शिंदेंच्या विधानसभा मतदारसंघात कोण? जागावाटपा आधीच मिळालं उत्तर..
Congress MP Praniti Shinde on Maharashtra Election : राज्यात आता फक्त विधानसभा निवडणुकीचीच (Maharashtra Elections) चर्चा ऐकू येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या (MVA) आहेत. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र नेत्यांकडून मतदारसंघावर दावा ठोकला जात आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनीही आता महाविकास आघाडीला अस्वस्थ करणारं वक्तव्य केलं आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार असणार यावर त्यांनी भाष्य केलं आहे.
प्रणिती शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकावर घणाघाती टीका केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवरही (Elections 2024) भाष्य केलं. सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा (Congress Party) एकनिष्ठ कार्यकर्ताच लढणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात चर्चा होईलच. पण मी माझं मत मांडलं आहे.
Praniti Shinde यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले आमच्या मनात
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सध्या रिक्त आहे. प्रणिती शिंदे आता खासदार आहेत. अशा परिस्थितीत ही जागा कुणाला द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपात याचा निर्णय होईल. येथे काँग्रेसचा आमदार होता त्यामुळे सहाजिकच ही जागा काँग्रेसलाच मिळणार असे सांगितले जात आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी तशी तयारीही केली आहे. जागावाटपातही हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार याची खात्री काँग्रेस नेत्यांना आहे. निर्णय अजून बाकी आहे. मात्र त्याआधीच ही जागा काँग्रेसला मिळणार असल्याचे प्रणिती शिंदेंनी सांगून टाकले आहे.
प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, देश तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हा देशए एकसंधच आहे. आपला देश सेक्यूलर आहे. ध्रुवीकरणाचे कितीही प्रयत्न झाले तरी यशस्वी होणार नाहीत. राज्याच्या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांनी सॉलिड सरकार देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
मोठी बातमी! अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी जनहित याचिका; मागणी काय?