Download App

विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप, संजय राऊत म्हणाले, ‘भाजपाचा खरा चेहरा…’

विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पैसे वाटल्याचा आरोप होतोय. तावडेंच्या कृतीमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, असं राऊत म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीविनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हॉटेल विवांतामध्ये पैशांचे वाटप तावडे करत असल्याचा आरोप बविआचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी केला. दरम्यान, यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊ (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं. तावडेंच्या कृतीमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, असं राऊत म्हणाले.

अर्रर्र! इंस्टाग्राम ॲप डाउन? सर्व्हर, लॉगिनच्या समस्या… नेटिझन्सने X वर पोस्ट करत तक्रारी नोंदवल्या 

संजय राऊत म्हणाले, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडले ते कॅमेऱ्यांपुढं आहे. या प्रकरणी खुलासे कशाचे होत आहेत? भाजपचा खरा चेहरा समोर आला. त्यांचा या निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे भाजपचे सरचिटणीस आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांकडे 5 कोटी रुपये सापडलेत. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही रक्कम जप्त केली. पैसे तोंडावर फेकले तोंडावर व गोंधळ घालून विनोद तावडे यांना तिथे कोंडून ठेवले. यावर कोणता खुलासा करणार हे भाजपने सांगावं. ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करायला हवे. सत्ताधारी पक्षाकडून निवडणुका कशा लढवल्या जातात, हे उघड झाले आहे, असं राऊत म्हणाले.

पैसे वाटणाऱ्या विनोद तावडे अन् भाजपावर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, पटोलेंची मागणी 

पुढं ते म्हणाले,  विनोद तावडे हे  स्वत: पैसे वाटतात हे आश्चर्य आहे. आमच्या बॅगा, विमानं, हेलिकॉप्टर, गाड्यांच्या डिगी उघडतात. आमच्या मागे जो ससेमिरा लावलाय, पण भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मागे लावला असता तर किमान १००० कोटी रुपये मिळाले असते.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात किमान 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले. आज नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे पैसे जप्त करण्यात आले. मुंबईत पैसे वाटण्यासाठी ठाण्यातून खास लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याच्या बाजूला ईशान्य मुंबई आहे, तिथे शिंदे यांचा राम रेपाळे हा माणूस आहे. हा माणूस रात्रीच्या अंधारात पैसे घेऊन येतो व मतदारांना पैसे वाटतो. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात ठाण्याला परत जातो. २३ तारखेनंतर राम रेपाळेचं काय करायचं आहे ते बघू, असं राऊत म्हणाले.

follow us