Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election Result) निकालानंतर आता सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलायं. महायुतीला सर्वाधिका जागा मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतलीयं. त्यामुळे आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालंय. अशातच एकनाथ शिंदेंचे विश्वासू नेते आमदार संजय शिरसाट यांनी दावा केलायं. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार नसल्याचा दावा शिरसाट यांनी केलायं.
संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले , मुख्यमंत्रिपदावर असेलेले एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर जाणे योग्य नाही. कदाचित ते उपमुख्यमंत्री बनणार नाहीत. शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याला ते उपमुख्यमंत्री करण्यास सांगतील. एकनाथ शिंदे यांना सोडून शिवसेनेतील इतर कोणत्याही नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केलायं.
जाणत्या राजाने जनाधार गमावला, आता राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावं; विखेंचा पवारांना टोला
मोदी-शाहांचा निर्णय आम्हाला मान्य…एकनाथ शिंदे
महायुतीने 288 पैकी 236 जागा जिंकून ही निवडणूक एकतर्फी जिंकली. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेला सस्पेन्स आज जवळपास दूर झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या अडीच वर्षात आमच्या सरकार पाठबळ दिलं. मी आता सरकार स्थापन कोणतीही अडचण येऊ देणार नाही. मोदी-शाह मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राज्याचा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा करण्यासाठी आज राजधानी दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. सध्या तरी फडणवीसांचाच दावा प्रबळ मानला जात आहे. मात्र तरी देखील ऐनवेळी दुसरेच नाव समोर येईल का अशी शंकाही भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याबाबत विचारले असता फडणवीस यांनी काहीच न बोलता फक्त हात जोडले.