Download App

शिवाजीराव कर्डिलेंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गर्दीच गर्दी, पंकजा मुंडेंनी सभा गाजवली

Pankaja Munde : राज्यात आगामी निवडणुकीत भाजप महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde : राज्यात आगामी निवडणुकीत भाजप महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) हे आमच्यासाठी लकी आहेत. ते यंदा शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि सरकारही आपलेच असणार आहे. असा विश्वास आज शिराळ चिचोंडी येथे आ. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत व्यक्त केला.

या वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीमध्ये माझा व माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांचा पराभव फेक निगेटिव्हमुळे झाला आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक शौचालय, गॅस सिलेंडर, शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना यशस्वीपणे राबवलली आहे.

देशात नरेंद्र मोदीचे सरकार असून महाराष्ट्रात देखील महायुतीचे सरकार आणायचे आहे. लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहण्यासाठी नगर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. भाऊ एक वेळेस बहिणीला सोडत असतो मात्र बहीण कधीही भावाला सोडत नसते. विरोधकांना चांगले सरकार चालवता येत नाही. नगर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासारख्या हुशार पैलवानला निवडून द्या.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे आमदार, खासदार बनवणारी फॅक्टरी होती. विरोधक सविधान जातियवाद यावर अफवा पसरवतात या गोष्टीवर विश्वास न ठेवता विकासाच्या कामाला मतदान करा असे आवाहन भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी माजी खासदार डॉ .सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, श्रीगोंद्यातील भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, युवा नेते अक्षय कर्डिले, राजू शेटे,ह सुरेश बानकर, अशोक सावंत,मृत्युंजय गर्जे ,दिलीप जठार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, मतदार संघ पुनर्रचनेत तुकडे झाले त्यामुळे माझे राजकारण संपले असे वाटले. मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी 2009 मला भाजपची उमेदवारी दिली व मी आमदार झालो. त्या माध्यमातून राहुरी मतदार संघातील नागरिकांना विकास काय असतो हे दाखवून दिले. तीस वर्षापासून सुरू असलेल्या जनता दरबारामध्ये कोणीही प्रश्न घेऊन येतात आणि ते मी सोडवितो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात डीपी बंद करून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात होते. मात्र महायुती सरकारने शेतकऱ्यांना वीज माफ करून मोफत वीज देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रुपया पिक विमा काढला आणि लाखो रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले.

आज 8 नोव्हेंबर, मी दिवस मोजणार फक्त तुम्ही.., पंतप्रधान मोदींचे उद्धव ठाकरेंना चॅलेंज

पालकमंत्री व माजी खासदार विखे यांनी ठरवले तर नगर जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निवडून येतील तरी त्यांनी सर्वांकडे लक्ष द्या. माजी खासदार डॉ.सुजय विखे म्हणाले की, आताच्या विधानसभेनंतर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. महाविकास आघाडी हे स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे. शेतकरी हिताचे सरकार आणायचे आहेत यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना निवडून द्या. कर्डिले साहेब तुम्ही कसलीच काळजी करू नका; योग्य वेळी सर्व पोहोच होईल.पंकजा ताईसारखे नेतृत्व आपल्याला लाभले आपले भाग्य आहे.

follow us