Kashinath Date : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Result) जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन होणार आहे. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल देखील समोर आले आहे. अशाच एक निकाल म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंके (Rani Lanke) यांचा पराभव.
पारनेर विधानसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCPSP) निवडणुकीच्या रिंगणात होते तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (NCP) काशिनाथ दाते (Kashinath Date) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला या निवडणुकीत राणी लंके सहज बाजी मारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र काशिनाथ दाते यांनी सर्वांना धक्का देत बाजी मारली.
राणी लंके यांच्या पराभव करून जायंट किलर ठरलेले काशिनाथ दाते यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे. शेवटच्या दोन दिवसात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आल्याने माझा लीड कमी झाला असा खुलासा त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला.
लेट्सअप मराठीशी बोलताना काशिनाथ दाते म्हणाले की, मतदारसंघात शेवटच्या दोन दिवसात विरोधकांनी मोठ्या प्रमाणात पैसे वाटले त्यामुळे माझा लीड कमी झाला अशा खुलासा आमदार काशिनाथ दाते यांनी लेट्सअपशी बोलताना केला.
विरोधकांनी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. विरोधकांनी पैसे वाटप केल्याने माझा लीड कमी झाला नाहीतर मी या निवडणुकीत 25 हजारांनी जिंकून आलो असतो असं देखील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते म्हणाले.
ताहिर राज भसीनचा जागतिक हिट शो : ‘ये काली काली आंखें 2’ 10 देशांत गाजतोय
संपूर्ण मतदारसंघात लंके विरोधात लाट होती त्यामुळे मला माझ्या विजयची सुरुवातीपासून खात्री होती असेही ते म्हणाले. निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत विखे कुटुंबावर घराणेशाहीची टीका केली होती मात्र त्याच व्यक्तीने विधानसभा निवडणुकीत पत्नीला उमेदवारी दिली. हे मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीला मान्य नव्हती आणि त्यामुळे पहिल्या दिवसापासून माझा माझ्या जिंकण्याची खात्री होती असेही आमदार काशिनाथ दाते लेट्सअप मराठीशी बोलताना म्हणाले.