Sambhajirao Patil Nilangekar : सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या पोराला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बहुमान देणाऱ्या माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे, प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातूर यांनी केले. ते निलंगा विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी झालेल्या कॉर्नर बैठकात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे राजकीय क्षेत्रात काम करत असताना सर्व समाजाला समान न्याय देणारी नेतृत्व आहे आणि म्हणूनच माझ्यासारख्या लिंगायत समाजातील सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. अशा पदावर अनेक दिग्गजानी काम केलेले आहे. या दिग्गजांच्या मांदियाळीत माझ्यासारख्या शेतात कबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या शेतकरी पुत्राला एवढी मोठी संधी प्राप्त करून दिली. केवळ मला संधी दिली असे नव्हे. लिंगायत समाजातील अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी देऊन लिंगायत समाजाचा बहुमान वाढविण्याचे काम माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून दोन टर्म काम करण्याची संधी नागनाथ आण्णा निडवदे यांच्या रूपाने दिली. निलंगा नगरपालिकेचे उपाध्यक्ष मनोज कोळे हा सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता त्यांना कधीही वाटले नसेल की मी या नगरीचा उपनगराध्यक्ष होईल. पण ही किमया माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी करून दाखवली.
20 नोव्हेंबरला मतदानाचा टक्का वाढावा, सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही राहणार बंद
निलंगा विधानसभेत तीन तालुके येतात त्यापैकी शिरूर आनंतपाळ व देवणी या तालुक्यातील मंगेश पाटील व नागनाथ गरिबे या दोन कार्यकर्त्यांना दोन टर्म तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन लातूर शहर विधानसभेची उमेदवारी सुद्धा मिळवून दिली आणि त्या निवडून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या कार्यसम्राट , काम करण्याची अफाट शक्ती असणाऱ्या . एक प्रभावी आमदार अशी ओळख असलेल्या माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर याना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. असे आव्हान शेवटी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे यांनी केले.