Yashomati Thakur On Mahayuti : ‘अखबार भी तुम्हारा, लश्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा, तुम झुठ पे झुठ बोलते जाओ क्यू के अखबार भी तुम्हारा’ अशी शायरी म्हणत, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आज यशोमती ठाकूर यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघातून (Tivas Assembly Constituency) चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आयोजित सभेत बोलताना त्यांनी भाजपसह (BJP) महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
या वेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रतिम काम करत सातत्याने आपल्या संपर्कात होते. ‘माझा घर माझी जबाबदारी’ सारखा उपक्रम राबवला. महाविकास आघाडीच्या सरकारने कोरोना काळात देखील शेतकऱ्यांना मदत केली. तीन वर्षांपूर्वी सोयाबीनला भाव 7-8 हजार होता मात्र आता सोयाबीनला भाव फक्त 3200 भाव आहे. तसेच सरकारला उशिरा लाडक्या बहिणीची आठवण आली आणि त्यांनी 1500 रुपये दिले अशी टीका यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली. तसेच तुम्हाला नोकरी पाहिजे की भीक, सोयाबीनला भाव पाहिजे की जुमलाबाजी असं देखील त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ही निवडणूक नाही एक लढाई आहे. ही लढाई संविधान वाचवण्याची आहे. दोन पक्षाची तोडफोड करण्याचा काम ह्या लोकांनी केला आहे. जे पक्ष तुटले त्यांना मूळ पक्ष देण्याचे काम या संविधान विरोधी लोकांनी केलं आहे. अशी टीका त्यांनी यावेळी विरोधकांवर केली. तसेच तुम्ही संविधान तोडण्याचा काम करणाऱ्यांना साथ देणार का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला.
तसेच या सरकारच्या काळात महाराष्ट्राचे सर्व उद्योग गुजरातला गेले आणि महाराष्ट्रामध्ये एका रुपयाचाही गुंतवणूक आली नाही असं देखील या सभेत बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या. अखबार भी तुम्हारा, लश्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा, तुम झुठ पे झुठ बोलते जाओ क्यू के अखबार भी तुम्हारा अशी शायरी म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर हल्लाबोल केला.
हे लोक बदमाश आहे, उशिरा लाडक्या बहिणीची आठवण आली आणि त्यांनी 1500 रुपये दिले अशी टीका यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या. तसेच नौटंकी करणाऱ्यांना साथ देऊ नका असा आवाहन देखील यावेळी यशोमती ठाकूर यांनी केली.