जागावाटपाचं गणित जुळलंय, कॉंग्रेसची तिकीटांची यादी आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार; नाना पटोले

जागावाटपाचं गणित जुळलंय, कॉंग्रेसची तिकीटांची यादी आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार;  नाना पटोले

Nana Patole On MVA Seat Shating Criticized BJP : कॉंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीच्या जागांवर बोलताना मोठं विधान केलंय. वाटाघाटीतून जागांचा प्रश्न सुटेल, असं त्यांनी म्हटलंय. कॉंग्रेसची तिकीटांची यादी आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार, असं नाना पटोले म्हणाले ( MVA Seat Shating) आहेत. जागावाटपाचं आमचं गणित जुळलेलं आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

राहुरीत भाजपकडून शिवाजी कर्डिलेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार

संजय राऊतांनी विधानसभा निवडणुकीत 100 प्लस जागांच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, तुम्ही संजय राऊत यांना फार मनावर घेऊ नका. काही जागेवर चर्चा सुरू (Congress Leader Nana Patole) आहे. महायुतीमध्ये काय सुरू आहे? चंद्रकात पाटील यांना माहिती आहे. त्यांचे सगळे दिल्लीत आहेत. वाटाघाटीतून प्रश्न सुटतील . थोड्या जागांचा प्रश्न लवकर सुटेल, असं नाना काटे म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत घटक पक्षांना 85-85-85 जागा सुटल्याचं ते म्हणाले आहेत.

समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

आता सध्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा नाही. राज्य वाचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असं नाना पटोले म्हणाले आहेत. मुख्यमंत्रिपदाची चर्चा थांबवली पाहिजे. अजून काहीच ठरलेलं (Assembly Election) नाही, मतदान नाही उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. भाजप म्हणतंय की, आमचं सरकार येणार आहे. या डाकू लोकांची भूमिका आता दिसत आहे, अशी टीका पटोलेंनी केलंय. आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या महाविकास आघाडीच्या जागावाटप जाहीर होईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

महायुतीमध्ये देखील जागावाटपांचा तिढा सुटलेला नाही. अजून गोंधळ सुरूच आहे. सरकार आणणं हे आमचं दायित्व आहे. त्यामुळे आमचं त्याच्यावरच लक्ष आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरूवात केलीय. परंतु कॉंग्रेसने अजून अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. कॉंग्रेस नेमके कोणते शिलेदार रिंगणात उतरवणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज संध्याकाळ किंवा उद्या आमचे उमेदवार जाहीर होतील, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube