Mahrashtra Assembly Election : भुजबळांचे घर फुटणार ? आधी राजीनामा द्या, अजितदादांची आक्रमक भूमिका

  • Written By: Published:
Mahrashtra Assembly Election : भुजबळांचे घर फुटणार ? आधी राजीनामा द्या, अजितदादांची आक्रमक भूमिका

Nandgaon Assembly Constituency: विधानसभा निवडणुकीचे (Mahrashtra Assembly Election) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप फायनल झालेले नाही. त्यात दोन्ही आघाड्यांमध्ये बंडखोरी होऊ लागली आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांचे कुटुंब फुटले आहे. गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक शरद पवार गटात जात तुतारी फुंकली आहे. तर दुसरीकडे आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचे कुटुंब हे फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. ते मुंबईचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे समीर भुजबळ यांनी पदाचा राजीनामा घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केल्याची माहिती समोर येत आहे.

अनुराधा नागवडेंचा अजितदादांना धक्का; मशाल चिन्हावर मविआच्या उमेदवार?

छगन भुजबळ हे नागरी पुरवठा मंत्री असून, ते येवला मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तर त्यांचा मुलगा पंकज भुजबळ यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले आहे. आता भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हेही उमेदवारी मागत आहेत. ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला जात आहे. येथून शिंदे गटाचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहे. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे तेच येथून उमेदवार असणार आहे. या परिस्थितीत समीर भुजबळ हेही नांदगावमधून लढण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे ते अजितदादांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत.

महेश लांडगेंची गाडी सुसाट… ‘मविआ’चा उमेदवारच ठरेना!

समीर भुजबळ हे बंडखोरी करू शकतात. त्यामुळे भुजबळ यांच्याकडील मुंबई अध्यक्षपद काढून घ्यावे, अशी सूचना अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना दिल्याचे वृत्त समोर येत आहे. परंतु पक्षाने अधिकृतपणे याबाबत जाहीर केलेले नाहीत. दुसरीकडे समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाच्या राजीनामा देण्याबाबत पक्षाकडून सांगण्यात आलेले नाही, असा दावा केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube