Download App

Video : दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का?; ठाकरेंची पुन्हा झाडाझडती

दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का? असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना केलायं.

Udhav Thackeray News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या जाहीर सभांचा धडाकाही सुरु आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची आज धाराशिवमध्ये सभा पार पडत आहे. उद्धव ठाकरेंची यवतमाळनंतर आज पुन्हा धाराशिवमधील औसा हेलिपॅडवर बॅग तपासण्यात आलीयं. या मुद्द्यावरुन ठाकरेंनी व्हिडिओ शूट करीत अधिकाऱ्यांना चांगलच झापल्याचं दिसून आलंय. दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का? असा उपरोधिक सवाल उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केलायं. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलायं.

या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले, बॅग तपासण्याआधी मला तुमची ओळखपत्रे नियुक्तीपत्रे दाखवावीत, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ आपापली ओळखपत्रे दाखवली. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांच्या खिशात किती पैसे आहेत, यासंदर्भातही चौकशी उद्धव ठाकरे यांनी केलीयं. त्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी आपल्या बॅगची तपासणी करुन दिली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

धाराशिवच्या जिव्हाळ्याचा कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार -राणाजगजितसिंह पाटील

तपासणी सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओग्राफरचीही कसून चौकशी केलीयं. तुम्ही आत्तापर्यंत किती जणांची तपासणी केलीयं, तुम्हाला दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का? आज पंतप्रधान मोदींची सभा आहे, त्यांचीही तपासणी झाली पाहिजे ही माझी मागणी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना बजावून सांगितलंय.

“..अन् आता तेच मला रिटायर करायला निघालेत”; दाखला देत अजितदादांचं शरद पवारांना उत्तर

यवतमाळमधील वणीमध्येही उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात सभांसाठी येत आहेत. त्यांच्याही सर्वांच्या बॅगा तपासण्याचा व्हिडिओ तुम्हा अधिकाऱ्यांकडून मला हवा आहे. आजचा माझी बॅग तपासण्याचा व्हिडिओ मी शेअर करीत आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांवर संतापले आहेत. त्यावर उत्तर देताना अधिकाऱ्यांनीही आम्ही सर्वांच्या बॅगा तपासणार असल्याचं स्पष्ट केलं.

follow us