Download App

लोहगावाला विकासाच्या प्रवाहात आणणार; बापूसाहेब पठारे यांचा निर्धार

Bapusheb Pathare: येणाऱ्या काळात या सर्व समस्या नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावत लोहगावाला विकासाच्या प्रवाहात आणणार.

  • Written By: Last Updated:

पुणे: मागील दहा वर्षांत वडगावशेरी (Vadgaon Sheri Assembly) मतदारसंघातील लोहगावच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पाणी, रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सुविधाही इथल्या नागरिकांना पुरवण्यात आल्या नाहीत. परंतु, येणाऱ्या काळात या सर्व समस्या नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावत लोहगावाला विकासाच्या प्रवाहात आणणार”, असे म्हणत वडगावशेरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे (Bapusheb Pathare) यांनी लोहगाव भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान, महानगरपालिका पाणी पुरवठा तसेच पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोहगाव भागात पाण्याची मोठी समस्या गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. अनियमित व अपुरा पाणी पुरवठा यामुळे लोहगावकर हैराण झाले आहेत. यावर बापूसाहेब पठारे यांनी काल पालिका अधिकाऱ्यांसोबत पाण्याच्या टाक्यांची पाहणी केली. पाहणी झाल्यानंतर पठारे यांच्या माध्यमातून पाणी प्रश्न नक्की सुटेल, अशी सकारात्मक चर्चाही इथल्या नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.अधिकाऱ्यांनीदेखील महानगरपालिकेच्या माध्यमातून लोहगावमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी दगडूदादा खांदवे (सामाजिक कार्यकर्ते), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र खांदवे, सुभाष काळभोर,सुनिल खांदवे. सागर खांदवे, केशव राखपसरे, निलेश पवार, विजय निमगिरे, तुषार बालघरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे एकनाथ खांदवे, सोमनाथ खांदवे, शरद खांदवे, श्रीकांत खांदवे, सचिन खांदवे, दिपक खांदवे, रमेश खांदवे, अंबर खांदवे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास खांदवे, भाऊसाहेब खांदवे, प्रताप खांदवे, रामभाऊ खांदवे उपस्थित होते.
लोहगाव-वाघोली या रस्त्यावरील ‘स्मशानभूमी ते संतनगर’ दरम्यानची होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या रस्त्यावरील महावितरणचे विद्युत तारा भूमिगत करून रस्त्याच्या दोन्ही बाजूचे विद्युत पोल हटविणेबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्या तयार करून रस्ता करण्यासाठी मनपाच्या पथ विभागाला कारवाई करण्यास सांगितले आहे. लवकरच ही कामे सुरू होणार आहे असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले आहे.

follow us