गुहागर : आजपर्यंत तुम्ही लुबाडणाऱ्या, फसवणाऱ्यांना मतदान केलंत मात्र, यावेळी त्यांना नाकारा आणि माझ्या सर्व उमेदवारांना मतदान करा मी तुम्हाला महाराष्ट्रात चमत्कार घडवून दाखवतो असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे. ते गुहागर येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मी कोकणात कधीही आलो की कोकण भुरळच घालतो असे राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray Guhagar Speech)
Video : जेवढा जोर लावायचा तेवढा लावा पण…; शाहंच्या निशाण्यावर पुन्हा पवार, थेट दिलं चॅलेंज
राज ठाकरे म्हणाले की, कोकणात कधीही आलो की कोकण भुरळच घालतो. मी जेंव्हा परदेशात गेलो आणि तिकडचा निसर्ग पाहिला की असं वाटतं कोकणात पण इतका सुंदर निसर्ग आहे पण, आपल्याकडे छान सुविधा का नाहीत ? तुम्ही खरं तर भाग्यवान आहात की इतका सुंदर निसर्ग तुम्हाला मिळाला फक्त एकाच बाबतीत तुम्ही दुर्दैवी आहात ते म्हणजे तीच तीच लोकं तुम्ही निवडून देताय.
आज कोकणात शिक्षणाच्या, नोकरी धंद्यासाठी कोकण सोडून बाहेर जातात हे किती दुर्दैव आहे. ७५० किलोमीटरची किनारपट्टी लाभलेला हा भाग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पण इथे वीजप्रकल्प येतात, रिफायनरी येतात, त्याऐवजी पर्यटन प्रकल्प राबवले पाहिजेत.
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? शिराळ्यात अमित शहांनी भर सभेत दिले संकेत
इथल्या पर्यटनावर आख्ख महाराष्ट्र पोसला जाऊ शकतो
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही अशा लोकांना निवडून देताय ज्यांच्याकडे कल्पनाशक्ती नाही इच्छा नाही. ही सगळी लोकं वर्षानुवर्षे रोजगाराची स्वप्न तुम्हाला दाखवतात पण तुम्ही त्यांना विचारत का नाहीत की,का नाही रोजगार दिलात अजून ? इतका सुंदर प्रदेश आहे हा कोकणाचा, इथल्या पर्यटनावर आख्ख महाराष्ट्र पोसला जाऊ शकतो.
केरळ, गोवा ही राज्य फक्त पर्यटनावर उत्तम चालली आहेत. इतकं सुंदर कोकण करता येईल की ज्याची कल्पना करता येणार नाही. पर्यटनावर इतका रोजगार तयार होईल की तुम्हाला तुमचं गाव, जिल्हा सोडून जायची वेळच येणार नाही. तुम्ही ज्यांना खासदार म्हणून निवडून देता त्यांनी तुमचे कोणते प्रश्न मांडलेत दिल्लीत ? कोकणाचा कॅलिफोर्निया करू अशी आश्वासनं राजकारण्यांनी दिली पण त्यासाठी काय प्रयत्न केले? काहीही नाही…आणि हे असं का होतं की कारण दर ५ वर्षांनी तुम्ही त्याच त्याच लोकांना निवडून देत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
Sharad Pawar राजकारणातून निवृत्तीच्या संकेतावर यू टर्न, शरद पवारांनी काय दिलं स्पष्टीकरण
माझ्या हातात सत्ता देऊन बघा कोकण सर्वात श्रीमंत होईल
एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा मग बघा कसा कोकण गोवा, केरळपेक्षा मोठा श्रीमंत होईल. फक्त तुम्हाला माणसं बदलावी लागतील; आम्ही सत्तेत नसताना इतकी कामं केली, जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही काय करू ? मी सत्तेसाठी मागत नाहीये, खुर्चीसाठी नाही मागत आहे, माझी इच्छा आहे की मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती माझ्याकडे आहे.
तुम्ही ज्यांना निवडून दिलंत त्याच पक्षाचे लोकं तुमच्या जमिनीचे सौदे करत आहेत. बाकीचे सगळे जमिनी हडपण्यासाठी उभे आहेत तर हा राज ठाकरे सांगतोय की मी तुमच्या जमिनीवर विकास घडवून दाखवतो. म्हणून आजपर्यंत तुम्हाला लुबाडणाऱ्या, फसवणाऱ्यांना मतदान केलंत त्यांना नाकारा, आणि माझ्या सर्व उमेदवारांना मतदान करा आणि मी तुम्हाला महाराष्ट्रात चमत्कार करून दाखवतो. निवडणुका झाल्या की,जगभरात विकास म्हणजे काय असतो हे दाखवणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.