Download App

दोन्ही ठाकरेंची कोंडी? माहिम, वरळी मतदारसंघात परिस्थिती काय?

अमित ठाकरे माहिममधून तर आदित्य ठाकरे वरळीतून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे माहीम आणि वरळीत कोणता ठाकरे बाजी मारणार?

  • Written By: Last Updated:

Vidhansabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीचं (Mahayuti) तिकीट वाटप अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही आघाड्यांतील घटक पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले. तर पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहिममधून तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वरळीतून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे माहीम आणि वरळीत विधानसभा मतदार संघात कोणता ठाकरे बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

’15 रुपयांचा वडापाव ते 50 हजारांचा सूट..’ उमेदवारांसाठी आयोगाने रेटकार्डट दिले

ठाकरे बाजी मारणार का ?
वरळी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होणार आहे. शिंदे शिवसेनेकडून खासदार मिलिंद देवरा, मनसेकडून संदीप देशपांडे तर ठाकरे सेनेकडून विद्यमान आदित्य ठाकरे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. आपल्या कार्यशैलीच्या जोरावर आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघात अधिकच लोकप्रिय आहेत. मात्र काका राज ठाकरेंनी यंदा पुतण्याविरोधात उमेदवार देऊन ठाकरे शिवसेनेला अडचण निर्माण केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आदित्य ठाकरे वरळीतून निवडून आले होते.

राज्यातील 73 विधानसभेच्या जागा ठरणार सत्तांतरासाठी ‘टर्निंग पॉईंट’; जाणून घ्या, मायक्रो समीकरण 

2019 च्या विधानसभा निवडणुक 2019 शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना 89,248 हजार मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. डॉ. सुरेश माने यांना 21,821 मते तर वंचित बहुजन आघाडीचे गौतम अण्णा गायकवाड यांना 6,572 मते मिळाली होती.

उबाठाने उमेदवार देऊन अप्रत्यक्षपने अमित ठाकरे यांनाच मदत केली?
मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघ यावेळी चर्चेतला मतदार संघ राहणार आहे. याचे कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे. त्यांच्यासमोर शिंदे शिवसेनेचे सदा सरवणकर यांचे आव्हान असेल. तीन टर्मचे आमदार राहिलेले सदा सरवणकर निवडणुकीत अमित ठाकरे यांना सोपं आव्हान नसणार आहे. तर ठाकरे गटाकडून माहिम विभागप्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आलीय. यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी निवडणूक सोपी होणार असल्याचे बोलले जात आहे. अमित ठाकरे मतदारसंघात बाजी मारून विधानसभेत मनसेचा झेंडा फडकावणार हे पाहावे लागणार आहे.

विधानसभा निवडणूक 2009
नितीन सरदेसाई (मनसे)- 48,734 मते विजयी
सदा सरवणकर (काँग्रेस)- 39,808 मते
आदेश बांदेकर (शिवसेना)- 36,364 मतं

विधानसभा निवडणूक 2014-
सदा सरवणकर (शिवसेना)- 46,291 मतं विजयी
नितीन सरदेसाई (मनसे)- 40,350 मतं
विलास अंबेकर (भाजप)- 33,446 मतं

विधानसभा निवडणूक 2019
सदा सरवणकर (शिवसेना)- 61,337 मतं विजयी
संदीप देशपांडे (मनसे)- 42,690 मतं
प्रवीण नाईक (काँग्रेस)- 15,246 मतं

दोन्ही ठाकरेंसाठी कडवे आव्हान…
राजकीय विश्लेषण हेमंत देसाई म्हणाले की, वरळी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर संदीप देशपांडे यांच कोणताही प्रभाव मतदार संघावर नाही. मात्र खासदार मिलिंद देवरा यांची व्यापारी आणि गुजराती जैन लोकांवर मदार असणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना अवघड जाऊ शकते. दुसरं असं की, आदित्य ठाकरे यांचा काम मतदारसंघात चांगला असल्याने मतदारांनी त्यांना साथ दिल्यास आदित्य ठाकरे पुन्हा आमदार होऊ शकतात.

तर माहिम विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात देखील शिवसेनेचे प्राबल्य जास्त आहे. विद्यमान शिंदे सेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर स्थानिक मतदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच ठाकरे सेनेचे महेश सावंत यांना होईल. वरळी आणि माहिम मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना निवडणूकित खूपच तारेवरची कसरत करावी लागणार आहे, असं देसाईंनी सांगितलं.

follow us