Download App

‘दलित-मराठा-मुस्लिम समीकरण जुळलं तर…’, मनोज जरांगेंचा इशारा, आज धर्मगुरूंसोबत बैठक

दलित-मराठा-मुस्लिम यांनी समजूतदार होण्याची गरज आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. आपण एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange : महाराष्ट्रात एका जातीवर कोणीही निवडून येत नाही. त्यामुळे आज दलित, मुस्लिम आणि मराठा समीकरणाबाबत बैठक होणार आहे. समीकरणे जुळवण्यावर आमचा भर राहील. समीकरण जुळलं तर यांचं एकही सीट निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिलाय.

खांद्याला खांदा लावून काम केलं, पण माझंच तिकिट कापलं… हर्षदा काकडेंनी बोलून दाखवली खदखद 

विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायये की, नाही यावर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगेंनी आज धर्मगुरूंची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दलित, मुस्लिम मराठा समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज ही बैठक उशिरापर्यंत चालेल. दरम्यान, त्यापूर्वी जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आजच्या बैठकीनंतर कोणते मतदारसंघ लढायचे, कोणते उमेदवार द्यायचे हे ठरेल, केवळ एकट्या मराठा समाजामुळं निवडणुकीत यश मिळणार नाही. त्यामुळं मुस्लिम आणि दलित समाजाशीही समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न आहे. यासाठीच आज अंतरवली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली, असं जरांगे म्हणाले.

अजितदादा- फडणवीसांना धक्का! सीएमपदासाठी जनतेची एकनाथ शिदेंनाच सर्वाधिक पसंती, काय सांगतो सी वोटरचा सर्व्हे?

या बैठकीत काय निर्णय होतो, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, दिवाळी पाडव्याचा मुहूर्त चांगला असल्याने त्याच दिवशी आपण विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही, याचा निर्णय घेऊ, असे जरांगे यांनी सांगितले.

पुढं ते म्हणाले, दलित-मराठा-मुस्लिम यांनी समजूतदार होण्याची गरज आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. आपण एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही. एकत्र आलो तरच शेतकरी, मराठा अन् मुस्लिम समाजातील मुलेही आमदार आणि मंत्री होऊ शकतात. त्यासाठी समीकरणे जुळली पाहिजेत, आजच्या बैठकीत समीकरणं जुळवण्यावर भर राहिल आणि समीकरण जुळलं तर यांचं एकही सीट निवडून येऊ देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

follow us