Download App

Vidhansabha Election : मनोज जरांगेंचं ठरलं, बीडमध्येही देणार उमेदवार, धनंजय मुडेंची पहिली प्रतिक्रिया…

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी त्यांचे पत्ते उघड केलेत. विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघावर उमेदवार उभे करणार, कुठं पाठिंबा देणार आणि कोणत्या मतदारसंघातील उमेदवार पाडणार याची यादी अखेर समोर आली. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही मराठवाड्यातच जरांगेंचा महायुतीच्या उमेदवारांना सर्वाधिक धोका आहे. मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदु ठरलेल्या बीड जिल्ह्यात जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिलेदार उतरवण्याचं निश्चित केलंय. त्यामुळं मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं टेन्शन वाढलं.

अपक्ष विश्वजित गायकवाड यांची बिनशर्त माघार, उदगीरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत 

बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना जरांगेंनी दिल्या. त्यामुळे बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना जरांग पाटील यांच्या उमेदवाराचे आव्हान असेल. दरम्यान, मनोज जरांगे यांनी परळी मतदारसंघाबाबत अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही. उमेदवार देण्याच्या किंवा पाडण्याच्या यादीत परळी मतदारसंघाचं नाव नाही. दरम्यान, जरांगेंच्या भूमिकेवर आता धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं. धनंजय मुंडे हे आज गंगाखेडमध्ये असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर केलं. जरांगे पाटील यांनी राज्यातील काही ठराविक मतदारसंघात उमदेवार देणार असल्याचं जाहीर केलं. बीडमध्येही जरांगे उमदेवार देणार आहेत, त्यांच्या या भूमिकेविषयी विचारलं असता मुंडे म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका अगोदरच ठरवली होती, त्यामुळे त्याच्यावर फार काही बोलणार नाही. त्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, सगे सोयरेच्या मागणी संदर्भात देशाच्या संविधानात आणि संसदेमध्ये हा विषय पूर्ण होऊ शकतो, त्याला वेळ लागणार असं मुंडे म्हणाले.

मुंब्र्यात जाऊन आव्हाडांना अवकात दाखवू, ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरी संतापले… 

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचाही मुंडेंनी यावेळी समाचार घेतला. अजित पवारांचा पक्ष म्हणजे पाटिकटमारांची टोळी आहे. तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वत:चं वेगळं निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती, असं आव्हाड म्हणाले होते. यावर बोलतांना मुंडे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीने बोललेल, आम्हीही आमचे त्या काळचे आधारस्तंभ यांच्याबद्दल असंच बोलायचं का, असं धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचे नाव न घेता म्हटलं.

मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार कुठे लढणार, कुठे पाडणार?
या मतदारंसघात निवडणूक लढणार
1) हिंगोली
2) केज
3) कन्नड
4) परतूर
5) फुलंब्री
6) भोकरदन
7) पाथरी
8) बीड

इथे उमेदवार पाडणार
१) भोकरदन, (जालना)
२) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)
३) कळमनुरी, (हिंगोली)
४) गंगाखेड, (परभणी)
५) जिंतूर, (परभणी)
६)औसा-(लातूर)

पाठींबा देणार
1)बदनापुर (एससी राखीव )
2) औरंगाबाद पश्चिम (एससी राखीव)

follow us