मनोज जरांगे सुपारी घेवून तुतारी वाजवणार आहेत का? लक्ष्मण हाके आक्रमक
Laxman Hake Criticize Manoj Jarange Patil : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे. ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक लढवणार, अशी भूमिका जाहीर केल्यापासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी मनोज जरांगे यांनी 135 आमदार पाडणार, अशी डरकाळी फोडली होती. दरम्यान जरांगेंनी आज उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर केले आहेत. यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय.
लक्ष्मण हाके म्हणाले की, आज मनोज जरांगे औकातीवर आलेत. एक मराठा लाख मराठा मतांचे मूल्य नसतं, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय. तुम्ही 135 आमदार पाडणार होते? असा घणाघात हाकेंनी केलाय. पवारांनी त्यांना डाफरले आहे. तुम्ही कसले बॉंड पेपर घेवून बसले आहात. तुम्ही शिलालेखावर लिहून घ्या, हे लोकं कुठल्या गोष्टीवर ठाम लिहित आहेत. मनोज जरांगे तुतारीची सुपारी घेऊन, ते तुतारी वाजवणार आहेत का? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय.
मनोज जरांगे बारामतीला मॅनेज झाले आहेत, असं खळबळजनक वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलंय. जरांगे यांच्या पाठीमागे दलीत आणि मुस्लिम समाज कसा जाईल? असा सवाल त्यांनी विचारला आहे. जरांगे नावाचे वटवागूळ महाराष्ट्राच्या मानेवर बसलं आहे. ते उद्या 3 नंतर इतिहास जमा होईल, असा दावा देखील लक्ष्मण हाकेंनी केलाय. आज जरांगे पाटलांनी जाहीर केलेल्या यादीत बारामतीचं नाव नाहीये.
समाजाची वेदना विसरु नका,आमदारकीला लाथ मारा ; मनोज जरांगे पुन्हा कडाडले
मनोज जरांगे यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत लढायचं आणि पाडायचं अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातून केज मतदारसंघ, हिंगोली जिल्ह्यात कळमणुरी, जालना जिल्ह्यात मंठा परतूर मतदारसंघ, परभणी जिल्ह्यात पाथरी मतदारसंघ, हिंगोली मतदारसंघ आणि नांदेडमधील हादगाव मतदारसंघातील भूमिका स्पष्ट केलीय. आता लोकसभेप्रमाणे विधानसभेत जरांगे फॅक्टरचा फटका बसणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.