Vidhansabha Election : एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही, सर्वच समाजाचे उमेदवार…; भुजबळांचे मोठे विधान

  • Written By: Published:
Vidhansabha Election : एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही, सर्वच समाजाचे उमेदवार…; भुजबळांचे मोठे विधान

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) मागण्या सरकारने मान्य केल्या नसल्याने त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या विरोधात आपले उमेदवार उभे करण्याचं जाहीर केलं. अनेक मतदारसंघात त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. त्यामुळं महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, जरांगे पाटील भुजबळांच्या विरोधातही उमेदवार देणार असल्याचं बोलल्या जातं. यावर आता मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) भाष्य केलं. सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात आहेत. त्यामुळं एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही, माझ्या सर्व विकास कार्यात मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी समाज माझ्यासोबत आहे, असं भुजबळ म्हणाले.

मला खुश करा, म्हणजे साहेब खुश होतील; अजित पवारांची बारामतीत भावनिक साद 

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात आहेत. त्यामुळं एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. माझ्या सर्व विकास कामांमध्ये मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी सर्व समाज माझ्या सोबत आहेत. केलेल्या विकासकामांमुळं मला खात्री आहे की, सर्वच जाती-धर्माचे लोक मला मतदान करतील. त्यापुढे जाऊन सर्व पक्षाचे लोक देखील छगन भुजबळ म्हणून मला मतदान करतील, असा विश्वास देखील भुजबळांनी व्यक्त केली.

सीएम योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणीला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई… 

महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांविषयी बोलतांना ते म्हणाले की, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी आहे. बंडखोरी हा निवडणुकीचा एक भाग आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसह सर्वच निवडणुकात बंडखोरी होत असते. यंदा विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात सरासरी 30 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या दुपारी चार वाजेपर्यंत खरं चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरूवात होईल, महविकास आघाडी आणि सर्वच पक्ष बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न करतील, हा निवडणुकीचा एक भाग आहे, सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. अस ते म्हणाले.

आता कोणाची मक्तेदारी राहिलेली नाही…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांची अंतरवाली सराटीत भेट झाली. याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, मनोज जरंगे पाटील यांची भेट घेणे फायदेशीर ठरेल, असे अनेकांना वाटत असेल. मी त्यांना शुभेच्छा देतो. पण आता कोणाची मक्तेदारी राहिलेली नाही, असा टोला त्यांनी जरांगेंना लगावला. पुढं ते म्हणाले, आता एकाच घरात वेगवेगळ्या विचारसरणीचे आणि पक्षाचे चार लोक काम करत असतात. मतदार है वैचारिक झाले आहेत. विचारधारी ही पक्षाच्या स्तरावर असते तिथं सर्व गोष्टी तपासल्या जातात. याचा विचार करून लोक योग्य ठिकाणी मतदान करतात. मतदार सुज्ञ झाला आहे. मतदारांना सर्व कळतं, मत कोणाला दिले पाहिजे. ते सर्व काही तपासून मतदान करतात असं भुजबळ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube