अनेक प्रकल्प अन् योजना अंतिम टप्यात; आपलं सरकार आलं की पूर्ण करणार- राणाजगजितसिंह पाटील

  • Written By: Published:
अनेक प्रकल्प अन् योजना अंतिम टप्यात; आपलं सरकार आलं की पूर्ण करणार- राणाजगजितसिंह पाटील

Ranajgajit Singh Patil : तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे राणाजगजितसिंह पाटील हे उमेदवार आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणत प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ तामलवाडी, काटगाव येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात त्यांना मोठ्या प्रमामात
नागरिकांचा प्रतिसाद लाभला आहे.

महायुती सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना आपण पूर्णत्वाच्या दिशेने पुढे नेल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला वैश्विक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी आपण स्वप्न पाहिले. त्याचा पाठपुरावा केला. केंद्रातील आपले सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने त्याला पाठबळ दिले आहे. आता २,००० कोटी रूपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम झाला आहे अशी माहिती पाटील यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत उच्च शिक्षण देणार; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा मतदारांना विश्वास

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आपण बाळगले आहे. त्यामुळे दळणवळणाची सक्षम यंत्रणा उपलब्ध होईल आणि त्यातूनही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती अपेक्षित आहे. आपल्या हक्काचे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णेचे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत तुळजाभवानी देवीच्या चरणी दाखल होत आहे. त्यातून १४,००० हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत.

आपल्या तामलवाडी येथे ३७० एकर क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्यातील १५० पेक्षा अधिक उद्योजकांनी तामलवाडी एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारी दाखवली आहे. या एमआयडीसीत १२,००० नोकर्‍या तयार होणार आहेत. त्याचबरोबर अप्रत्यक्ष रोजगाराची संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube