Sunil Shelke : मावळमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी विद्यमान आमदार सुनील शेळकेंना (Sunil Shelke) उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज असलेल्या बापू भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेवदारी अर्ज दाखल केला. त्यांना भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी पाठिंबा जाहीर केला. यावरून सुनील शेकळे यांनी बाळा भेगडेंवर जोरदार हल्लाबोल केला.
श्रीगोंद्यात उमेदवार बदलला! पाचपुते-नागवडे-शेलारांमध्ये सामना रंगणार…
बाळा भेगडे महायुतीचं काम करणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी पटली मारली. बाळा भेगडे हे पलटू मामा आहेत, अशी टीका टीका शेळकेंनी केला.
सुनील शेळके यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, सुनील शेळकेंनी भाजप संपवली असे आरोप बाळा भेगडे माझ्यावर करतात. पण, आपला पक्ष, आपले कार्यकर्ते सक्षम कसे होतील, यासाठीच मी प्रयत्न केला होता. कधी कुठला पक्ष संपत नसतो. मात्र काही मंडळी स्वत:च्या लोभासाठी माझ्याविरुद्ध एकत्र आले, बाळा भेगडेंनी आमदारकी भोगली, मंत्रिपद भोगलं, जिल्हा नियोजन समितचंच पदही त्यांच्याकडे होते. खरंतर एवढं सगळं मिळाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे होतं. मात्र, तसं काहीच न करता मला काय मिळेल, हेच ते पाहत आहेत. त्यांचं राजकारण स्वार्थी आहे. ते म्हणतात पक्ष संपला, पण पक्ष संपला नाही, तर तुमचं अस्तित्व संपत आलंय, असं शेळके म्हणाले.
शेळके म्हणाले, फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत बाळा भेगडेंनी महायुतीचं काम करावं, असं ठरलं होतं. सुनील शेळकेंना निवडूण आणा, असे आदेश फडणवीसांनी बाळा भेगडेंना दिले. त्यांनीही होकार दिला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना अशी काही चर्चा झाली नाही, असं भेगडेंनी सांगितलं. बाळा भेगडे हा पलटू मामा आहे, त्यांनी जे माध्यमांना सांगितलं, ते साफ खोट आहे. फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेत ते महायुतीचं काम करतील असं ठरलं होतं, पण त्यांनी पटली मारली, अशी टीका शेळकेंनी केली होती.
…अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई करणार; उद्धव ठाकरे गटाचा बंडखोरांना कडक इशारा
बाळा भेगडेंचा व्यक्तिगत स्वार्थ वाढला. सुनील शेळके उद्या मंत्री होईल, याची धास्ती त्यांना आहे. त्यामुळं आज ते आकसापोटी माझ्यावर टीका करत आहे, असंही शेळके म्हणाले.
बापू भेगडे साधूसंत नाही…
बापू भेगडे यांच्यासोबत लढायची माझी मानसिक तयारी आहे. शेवटी ही लोकशाही आहे. कोणी कोणाच्याही विरोधात उभा राहू शकतो. जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल. पण, बापू भेगडेंविरोधात लढायचंचं नाही, असं नाही. बापू भेगडेंच्या विरोधात न लढायला ते काही देव नाहीत की कुठलं साधू संत नाहीत, असंही शेळके म्हणाले.