Download App

ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबईत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी खेळली. माजी नगरसेवक रवी राजा (Ravi Raja) भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

  • Written By: Last Updated:

Ravi Raja Join BJP : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) निमित्ताने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.

भाजपचा उमेदवार पण, चिन्ह धनुष्यबाण अन् घड्याळ; ‘त्या’ मतदारसंघांत खास प्लॅन! 

रवी राजा यांनी गुरूवारी कॉंग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. यात त्यांनी लिहिलं की, माझ्या ४४ वर्षांच्या कॉंग्रेस पक्षाच्या सेवेचा आदर केला जात नसल्यावर माझ्या विश्वास बसला आहे. यामुळं मी सर्व पदांचा, पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं रवी राजा यांनी खर्गे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं.

‘फसक्लास दाभाडे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

दरम्यान, रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधीपक्ष नेते पद भूषवले आहे. ते काँग्रेसचा मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. ते विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागत होते, मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कॅप्टन तमिलसेल्वन यांच्याकडून 14 हजार मतांनी पराभूत झालेल्या गणेश यादव यांना तिकीट दिले. त्यामुळं त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काहीच दिवसांपूर्वी रवी राजा यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सकाळी ते भाजपच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी त्यांनी देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. यानंतर रवी राजा यांची मुंबई भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी बोलतांना फडणवीस यांनी रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केल्यानं त्याचा फायदा भापाला होईल. काँग्रेस पक्षातील काही नेते त्यांच्या मार्फत भाजपात येणार आहेत, असं सांगितलं.

दरम्यान, रवी राजा यांनी काँग्रेस सोडल्यामुळे कॉंग्रेसला असलेला तमिळ आणि मराठी मतदारांचा पाठिंबा कमी होण्याची शक्यता आहे. रवी राजा यांचा भाजप पक्षप्रवेश कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

 

follow us