Download App

आता अजितदादांकडे इनकमिंग, कॉंग्रेस आमदार सुलभा खोडके बांधणार घड्याळ, दिवस अन् वेळ ठरली…

काँग्रेस आमदार सुलभा खोडके (Sulabha Khadake) या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. खोडके यांनीच तसे संकेत दिले.

  • Written By: Last Updated:

Sulabha Khadake will Join NCP : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. अमरावतीच्या काँग्रेस आमदा सुलभा खोडके (Sulabha Khadake) या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. खोडके यांनीच तसे संकेत दिले.

मोठी बातमी! एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाड़ीमध्ये धडक , अनेक लोक जखमी 

आमदार खोडके या अजितदादांच्या पक्षात जाणार याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होती. अखेर तो दिवस येऊन ठेपला असून येत्या दोन दिवसांत त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. खोडके यांनी राष्ट्रवादीच्या अमरावतीतील जनसन्मान यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली असून अमरातवतीकरांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं.

रविवार 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर संकुलात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आमदार खोडके अधिकृतपणे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. खोडके यांनी जनसन्मान यात्रेबाबत फेसबुकवर पोस्ट केली आहे.

खोडकेंच्या पोस्टमध्ये काय?
अमरावतीच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने आज शहरात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. तसेच अजितदादा पवार यांनी सरकारमध्ये असतांना जे काही धोरणात्मक निर्णय घेतले त्याचा सुध्दा अमरावतील पुरेपुर लाभ झाला. म्हणूच अजितदादा पवार यांचे स्वागत व सत्कार करण्यासाठी जनसन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे, असं खोडके यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

मंजूर बंधारा काळे कारखान्याकडे हस्तांतरित केला असता तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते; आमदार आशुतोष काळे 

अजित पवार महायुतीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाल्यानंतर सुलभा खोडके यांची अजित पवार गटासोबत सलगी वाढली. अमरावती मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधी असो किंवा शासनस्तरावरील प्रलंबित समस्या असो, सुलभा खोडकेंनी दादांचीच मदत घेतली.

मध्यंतरी राज्यसभा आणि नंतर विधानपरिषद निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांवर झाला होता. कॉंग्रेसच्या ज्या पाच आमदारांनी दगाफटका केला, त्यांना विधानसभेची उमदेवारी नाहीच, असा निर्णय घेतला. त्यात सुलभा खोडकेंचे नाव होते. यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारात त्या कुठेही दिसल्या नाहीत. शिवाय त्यांनी जिल्‍ह्याच्‍या काँग्रेसच्‍या राजकारणात डावलले जात असल्‍याची तक्रारही अनेकदा केली. त्यामुळं त्या पुन्हा हातात घड्याळ बांधणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर अखेर रविवारी शिक्कामोर्तब होईल

follow us