Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव भारतीय समाजाच्या परिपक्वतेची जाणीव करून देणारा आहे. ही केवळ विजयाची नाही तर नम्र होण्याचीही संधी आहे. आपले भविष्य सुंदर होणार आहे. एक काळ होता जेव्हा लोक म्हणायचे की राम मंदिर (Ram Mandir) बांधले तर आग लागेल. अशा लोकांना भारत ओळखता आला नाही. यांना भारताच्या सामाजिक जाणीवेची पवित्रता माहिती नव्हती. प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम भारतीय समाजाच्या शांततेचे आणि समन्वयाचे प्रतीक आहे. हे बांधकाम कोणत्याही आगीला नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. राम अग्नी नसून ऊर्जा आहे. राम केवळ वर्तमान नसून शाश्वत आहे. राम ही समस्या नाही, तो उपाय आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधकांचे कान टोचले.
अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाली. यानंतर पुढं ते म्हणाले की, प्रभू श्रीरामासाठी कायदेशीर लढाई करावी लागली. पण न्यायाची प्रतिष्ठा जपल्याबद्दल मी भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार मानतो. याच न्यायाने राम मंदिर बांधले गेले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज प्रत्येक गावात एकाच वेळी कीर्तन-संकीर्तन होत आहे. आज अनेक मंदिरांमध्ये उत्सवाचे आयोजन केले जात आहे, स्वच्छता अभियान राबवले जात आहे. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. आज संध्याकाळी घरोघरी रामज्योतीची जय्यत तयारी सुरू आहे.
Ramayana: रामायणावर आधारित देशातील ‘या’ चित्रपटावर बंदी घालावी लागली, नेमकं प्रकरण काय?
आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेबद्दल, या क्षणाबद्दल बोलतील. हा रामाचा खूप मोठा आशीर्वाद आहे की आपण सर्वजण हा क्षण जगत आहोत आणि प्रत्यक्षात घडताना पाहत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, शतकानुशतकांच्या तपश्चर्येनंतर, संयम, त्यागानंतर आज आपला राम परत आला आहे. आपले प्रभू श्रीराम परत आले आहेत. 22 जानेवारी ही केवळ कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही तर, आजचा दिवस हा नव्या कालचक्राचा उगम आहे. आमचा रामलला आता तंबूत राहणार नाही, तर आता दिव्य मंदिरात विराजमान झाला आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हा क्षण अलौकिक आहे. ही ऊर्जा आणि वेळ आपल्या सर्वांवर प्रभू श्री रामाचा आशीर्वाद आहे.
चरणामृत सेवन करून मोदींनी सोडला उपवास; चरणामृत म्हणजे काय? सेवनाचे आहेत अनेक फायदे
मी नुकताच तुम्हा सर्वांसमोर गर्भगृहातून चैतन्याचा साक्षीदार म्हणून तुमच्यासमोर आलो आहे. तुम्हाला सांगण्यासारखं खूप काही आहे पण माझा कंठ दाटून आला आहे. मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करत आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्री राम आपल्या सर्वांना माफ करतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
जय सिया राम! 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान, PM मोदींच्या हस्ते पूजा, पाहा फोटो