Download App

Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत नेमकी काय चर्चा?

  • Written By: Last Updated:

Ram Mandir Pran Pratishtha:अयोध्येतील राममंदिरा (Ram Mandir) येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अनेकजण या दिवसाची आतुरतने वाट पाहत आहेत. मात्र, विरोधकांनी हा कार्यक्रम म्हणजे, भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग असल्याची टीका केली. दरम्यान, परदेशी माध्यमांनीही या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर भाष्य केलं.

Ayodhya : प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या ‘बातम्यांबाबत’ काळजी घ्या… मोदी सरकारची तंबी! 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेमध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसंदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. त्यात रॉयटर्सने लिहिलं की, अयोध्येतील सोन्याचा मुलामा असलेल्या मूर्तींचा साठा संपला आहे. अयोध्येतील विमानतळाजवळ आता पार्किंगसाठी जागा नाही. रॉयटर्सने या लेखात म्हटले आहे की, राम मंदिराच्या उद्घाटनाचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येईल. मंदिरामुळे भाजपला निवडणुकीत लक्षणीय आघाडी मिळणार आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनाचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसेल

तर अमेरिकन वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्टने लिहिले आहे की, हिंदू धर्मातील देवता भगवान राम यांच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनासाठी भारतातील उत्तर प्रदेशमधील अयोध्या या पवित्र शहरात जोरदार तयारी सुरू आहे. सोमवारी होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनामुळे हिंदू राष्ट्रवादाची एक दशक जुनी प्रतिज्ञा पूर्ण होणार आहे. एप्रिल किंवा मेमध्ये होणाऱ्या आगामी राष्ट्रीय निवडणुकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा महत्वाची भूमिका बजावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशभरात तसेच जगभरातील काही भारतीय दूतावासांमध्ये थेट स्क्रीनिंगची योजना आखली आहे.

Ayodhya : पहिले मुलाखत अन् मग काम; राम मंदिराचे दरवाजे बनवण्याऱ्या MD ची सत्व परीक्षा 

द इकॉनॉमिस्ट या ब्रिटनमधील लंडनमधून प्रकाशित होणाऱ्या पत्रिकेनं लिहिले की, अयोध्या शहर हे हिंदू धर्मातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक असलेल्या राम जन्म कथेचं केंद्र आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नशिबाचेही ते केंद्रस्थान आहे. 1980 च्या उत्तरार्धात भाजपने अयोध्येत 450 वर्षे जुन्या मशिदीच्या जागी मंदिर बांधण्यासाठी आंदोलन केले होते. भाजपच्या म्हणण्यानुसार प्रभू रामाचा जन्म झाला ती जागा मशीद बांधून ताब्यात घेण्यात आली होती.

द इकॉनॉमिस्टने लिहिले – ही जागा मशीद बांधून ताब्यात घेण्यात आली होती. मात्र, 1992 मध्ये, भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणांमुळे संतप्त झालेल्या जमावाने मशीद उद्ध्वस्त केली. त्यामुळं संपूर्ण भारतात दंगली झाली. या काळात सुमारे 2,000 लोक मारले गेले, ज्यात बहुतांश मुस्लिम होते. त्यानंतर रक्तपात होऊनही भाजपने मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. आता 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

दैवीय क्षण की, राजकीय नौटंकी?
ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर प्रश्न उपस्थित केला आणि लिहिले – हा दैवी क्षण आहे की राजकीय नौटंकी? पुढे लिहिले आहे की भारत एका विशाल हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी तयार आहे. निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या उद्घाटनाचा विरोधकांनी निषेध केला आहे. सध्या अयोध्येत सर्वात मोठे राम मंदिर बांधले जात असून सोहळ्याला उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये उत्साह आहे.

गार्डियनने पुढे लिहिले – अयोध्येतील पवित्र शहरातील राम मंदिर अर्धेच बांधलेले आहे. भव्य खांब, 49 मीटर (161 फूट) उंचीचे भव्य घुमट आणि विस्तृत प्रवेशद्वार आणि कोरीव काम हेच या बहुप्रतिक्षित मंदिराचे वैशिष्ट आहे. मात्र, सर्व काम काही अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या हे मंदिर बांधकाम साईट आहे. घुसखोरांना रोखण्यासाठी मंदिराला सुरक्षा पुरवली आहे. मंदिर परिसर विखुरलेल्या वस्तू आणि बुलडोझरने भरलेला आहे.

वृत्तपत्र पुढे लिहिते की, अर्ध्या बांधलेल्या अवस्थेतही या मंदिराचे महत्त्व अतुलनीय आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या उद्घाटनात सहभागी होणार आहेत. यावेळी मंदिराच्या आतील गाभार्‍यात हिंदू आराध्य दैवत रामाची मूर्ती ठेवली जाईल.

follow us