Download App

मोदींनी कधीच श्रीरामांच्या तत्वांचं आचरण केलं नाही; भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

  • Written By: Last Updated:

Subramaniam Swamy On PM Modi : आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. कारण, अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद मोदीच्या (PM Modi) हस्ते रामलल्लाची (Ramlalla) प्राणप्रतिष्ठ होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. सर्वत्र आनंद आहे. मात्र, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजप आणि मोदींवर विरोधकांनी जोरदार टीका केली. आता भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींनी (Subramaniam Swamy) मोदींवर टीकास्त्र डागलं. गेल्या दहा वर्षात मोदी रामराज्याप्रमाणे वागले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

जय श्री राम..! मुकेश अंबानींचे ‘अँटिलिया’ प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी सजले, पाहा फोटो 

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आता जवळ आला आहे. आज दुपारी 12.30 ते 1 या वेळेत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. दरम्यान, सुब्रम्हणम स्वामी यांनी ट्वीट करत लिहिलं की, मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होणार आचहेत. पण, पूजेदरम्यान, त्यांचा पंतप्रधानपदाचा दर्जा शून्य आहे.त्यांच्या पदाला शून्य महत्व असेल. मोदींनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात विशेषत: त्यांच्या पत्नीशी वागण्यात भगवान रामाचे अनुसरण केले नाही. गेल्या दशकभर पंतप्रधान म्हणून काम करतांना त्यांनी रामाच्या तत्वांचे आचरण केलं नाही. ते रामराज्याप्रमाणे वागले नाहीत, अशी टीका सुब्रमण्यम स्वामींनी केली.

China Landslide : चीनमध्ये भीषण दुर्घटना भूस्खलनामुळे 47 हून अधिक लोक ढिगार्‍याखाली अडकले 

तर काही दिवसांपूर्वी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. मंदिर अपूर्ण असून तिथे प्रपाणप्रतिष्ठा होऊ शकत नाही तसंच 22 जानेवारीला कुठलाही मुहूर्त नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.

ठाकरे गटाची टीका
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठेनिमित्त पूजा, व्रत, विधी आणि उपवास करत आहेत. पंतप्रधान सतरंजीवर झोपत असल्याचे प्रसिद्ध झालेले वृत्त गंमतीचे आहेत. या निमित्ताने अयोध्येत नवे ‘मोदी रामायण’ निर्माण झाले, ते पूर्णपणे राजकीय आहे. या ‘मोदी-रामायण’चा श्रीरामाच्या जीवन, चारित्र्याशी, रामराज्याशी, सत्य मार्गाशी, संयम आणि शौर्याशी काहीही संबंध नाही, त्याचे रामाणय त्यांच्यापाशी असा टोला ठाकरे गटाने लगावला.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलेल्या जवळपास सर्वच विरोधी नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला. प्रकाश आंबेडकर, मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी यांनी हा भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम असल्याचे म्हटले आहेय

follow us