120 Bahadur Director Rajneesh ‘Rezi’ Ghai Emotional : एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजची आगामी वॉर ड्रामा फिल्म ‘120 बहादूर’ ही वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानली जात आहे. हा टीझर, जो गायिका लता मंगेशकर यांची जयंती लक्षात घेऊन प्रदर्शित करण्यात आला होता, त्याला संपूर्ण देशातून प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा उलगडली जाणार असून, दिग्दर्शकांसाठी हे कथानक चित्रपट रूपात सादर करणं हे एक भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रवास ठरलं आहे. अशा वेळी दिग्दर्शक रजनीश ‘रेझी’ घई यांनी त्या खास क्षणाबाबत उघडपणे सांगितलं आहे, ज्याने त्यांना खोलवर स्पर्श केला.
खूप खोलवर भिडतो
जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की चित्रीकरणादरम्यान (120 Bahadur) असे कोणते प्रसंग होते का, ज्यांनी त्यांना किंवा क्रूला भावनिकदृष्ट्या ढवळून टाकलं, त्यावर उत्तर देताना रजनीश घई म्हणाले, जर तुम्ही या लढाईबद्दल जाणत असाल, तर 120 पैकी बहुतांश सैनिक या युद्धात शहीद झाले. त्यामुळे आम्ही अनेक दृश्ये अशी चित्रीत केली आहेत, जिथे एकामागोमाग एक सैनिक आपल्या सोबतचं माणूस गमावत (Rajneesh ‘Rezi’ Ghai) जातो. आणि ही दृश्यं इतक्या भावुकपणे समोर आली की, जेव्हा मी एडिटिंग करत होतो, तेव्हा एक-दोनदा माझ्या डोळ्यांतही पाणी आलं. मला वाटतं की या चित्रपटाचा भावनिक (Entertainment News) भाग खूप खोलवर भिडतो.”
भावनिक प्रवाह
ते पुढे म्हणाले, ही दृश्यं चित्रीत करणं खूप कठीण (Bollywood) होतं. जेव्हा तुम्ही स्वतः ती भावना अनुभवत असता आणि दृश्यं खरंच चांगली उतरतात, तेव्हा ती तुम्हाला अंतर्मनापर्यंत भिडतात. म्हणूनच मी म्हणेन की मला या चित्रपटाच्या भावनिक भागाचा खूप अभिमान वाटतो. हा भावनिक प्रवाह पूर्ण चित्रपटभर आहे, पण आम्ही त्या क्षणांना योग्य प्रकारे पकडले, असं मला वाटतं. जवानांमधली मैत्रीही अतिशय सुंदरतेने उलगडली गेली आहे.”
अतुलनीय शौर्याची कहाणी
‘120 बहादूर’ हा चित्रपट 13 कुमाऊँ रेजिमेंटच्या 120 भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्याची कहाणी आहे, ज्यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धात रेजांग ला येथे ऐतिहासिक लढाई लढली होती. या चित्रपटात फरहान अख्तर यांनी मेजर शैतान सिंह भाटी, पीव्हीसी यांची भूमिका साकारली आहे, जे आपल्या सैनिकांसह भारतीय लष्करी इतिहासातील सर्वात निर्णायक युद्धांपैकी एका लढाईत शेवटपर्यंत लढले. या चित्रपटाच्या मध्यवर्ती भावना एका ओळीत व्यक्त होते:
“आम्ही मागे हटणार नाही!”
चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीश ‘रेझी’ घई यांनी केलं आहे, तर निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) आणि अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओज) यांनी संयुक्तपणे केली आहे.’120 बहादूर’ हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.