Download App

Vidya Balan: ‘कपडे बदलण्यासाठी कारमध्ये…’, अभिनेत्रीने सांगितली बॉलिवूडची दु:खद आठवण

Vidya Balan Change Costume In Car For Kahaani Film: विद्या बालन (Vidya Balan ) ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Vidya Balan Change Costume In Car For Kahaani Film: विद्या बालन (Vidya Balan ) ही बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. (Costume) तिने 2005 मध्ये ‘परिणीता’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत, अभिनेत्रीने ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘भूल भुलैया’ सारखे अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत आणि तिची दमदार अभिनय क्षमता देखील सिद्ध केली आहे. (Kahaani Film) पण तुम्हाला माहिती आहे का? विद्या बालन ‘कहानी’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान काळ्या कपड्याने झाकलेल्या कारमध्ये कपडे बदलायची? विद्या बालन बॉलिवूडची ती दु:खद आठवण सांगितली.


विद्या बालनला कारमध्ये कपडे बदलावे लागले

‘कहानी’चे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी मॅशेबल इंडियासाठी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, चित्रपटाच्या टाइट बजेटमुळे विद्या बालनसाठी व्हॅनिटी व्हॅन खरेदी करू शकलो नाही. सुजॉय म्हणाला, “आमच्याकडे व्हॅनिटी व्हॅन घेण्याचे बजेटही नव्हते. आमचे बजेट कमी असल्यामुळे शूटिंग काही काळ थांबवण्याची लक्झरी आमच्याकडे नव्हती. त्यामुळे जेव्हाही तिला कपडे बदलावे लागायचे तेव्हा आम्ही शुटिंग थांबवायचो. तिची इनोव्हा मध्ये काळा कपडा झाकून ती रस्त्याच्या मधोमध काळ्या रंगाचा ड्रेस बदलायची आणि ती शूटिंगसाठी बाहेर पडायची.

सुजॉय घोष यांनी विद्याचे कौतुक केले

‘कहानी’मध्ये विद्या बालनसोबत काम करण्यास तयार झाल्याबद्दल सुजॉय घोषने तिचे कौतुक केले. सुजॉयने सांगितले की, विद्याने चित्रपट निर्मात्यासोबत काम करण्यास नकार दिला असता कारण तिचा 2009 मधील अलादीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. ‘कहानी’ दिग्दर्शकाने अभिनेत्रीची तुलना मेगास्टार अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार शाहरुख खान यांच्याशी केली आणि ती त्यांच्या लीगमध्ये येते असे सांगितले. ते सर्व आपापल्या कामासाठी कटिबद्ध असल्याचे दिग्दर्शकाने सांगितले आणि विद्याही तशीच आहे.

Vidya Balan Birthday: आई बनण्यावरून ट्रोल झाली अभिनेत्री, युजर्सना सुनावले खडेबोल

जगभरात प्रचंड नफा कमावला

2012 मध्ये रिलीज झालेल्या ‘कहानी’मध्ये विद्या बालनने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परमब्रत चॅटर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा थ्रिलर चित्रपट सुजॉय घोष यांनी लिहिला आणि सह-निर्मिती केली. 15 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 79.20 कोटी रुपयांची कमाई केली होती.

follow us