Download App

69 th National Film Awards मधील यशानंतर सुजीत सरकारकडून अमेरिकेतून टीमचं अभिनंदन!

69 th National Film Awards : आज 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( 69th National Award) वितरण करण्यात आलं. या सोहळ्याचं आयोजन दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुजित सरकार यांच्या सरदार उधम सिंह चित्रपटाचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळालं. कारण चित्रपटाला पाच कॅटेगिरी मध्ये पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत सरकारने यांनी चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे.

सुजीत सरकारने केलं टीमचं अभिनंदन!

सुजीत सरकार सध्या दुसऱ्या चित्रपटाच्या शुटींगसाठी अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांच्या यशाबद्दल चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले की, ‘मला दु:ख आहे की, मी या सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही. मात्र चित्रपटाची टीम या सोहळ्यात चमकत होती. तसेच निर्माते आणिल टीमचं अभिनंदन.’

‘अजित पवारांच्या मुख्यमंत्री करायचे होते की नाही, याचे उत्तर शरद पवारांकडे’

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चरित्र चित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाईन. या पाच कॅटेगिरीतील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. चित्रपटाचे हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि कीनो वर्क्सचे शील कुमार, त्याचबरोबर साऊंड डिझायनर सीनोल जोसेफ, प्रोडक्शन डिझायनर मानसिक रूप मेहता आणि कॉस्ट्यूम डिझायनर वीरा कपूर यांनी हजेरी लावली होती.

Gopichand Padalkar : एवढा माज, एवढी मस्ती… पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ पुन्हा घसरली

दरम्यान सरदार उदमसिंह हा चित्रपट सुजित सरकारी यांनी दिग्दर्शित केला असून हा चित्रपट देशभक्तीपर चित्रपट आहे. जो स्वातंत्र्य सैनिक उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात उधमसिंग यांची भूमिका अभिनेता विकी कौशल याने साकारली आहे. या चित्रपटाचा प्रेक्षकांसह समीक्षकांनी देखील भरभरून कौतुक केलं होतं.

Tags

follow us

वेब स्टोरीज