Gopichand Padalkar : एवढा माज, एवढी मस्ती… पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ पुन्हा घसरली
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी देखील पवारांवर बोलताना त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी गेल्यावेळी नाव न घेता पवारांना लबाड लांडगा म्हटले होते. तर यावेळी त्यांनी थेट एवढा माज आला कुठून? एवढी मस्ती आली कुठून? असा सवाल करत पवारांवर खालच्या पातळीची टीका केली आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे यांनी सध्या धनगर आरक्षणासाठी धनगर जागर यात्रा काढली आहे. यावेळी भाषण करताना पुन्हा एकदा पडळकरांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्यात आमची लोकसंख्या दोन कोटी असताना आम्हाला साडेतीन टक्के आरक्षण दिलं. तर या लबाड लांडग्याने समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
Praniti Shinde : बड्या कंत्राटदारांना महाराष्ट्र विकण्याचं भाजपचं षडयंत्र; प्रणिती शिंदेचं टीकास्त्र
तसेच यावेळी त्यांनी कर्जत जामखेडमधील शरद पवारांचा नातू आणि आमदार रोहित पवारांवरून देखील शरद पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, जेव्हा आपण चौंडीमध्ये अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करायचो. तेव्हा राजकारण होत नव्हतं. मात्र गेल्यावर्षी 83 वर्षांचे शरद पवार चौंडीत आले आणि वाद सुरू झाले. तर गेल्या 83 वर्षांत हा बहाद्दर एकदाही चौंडीत आला नाही. तेव्हा त्यांना अहिल्याबाईंची जयंती साजरी करायची नव्हती. मात्र जेव्हा नातवाला लॉंच करायचं होतं. तेव्हा ते 82 व्या वर्षी चौंडीत आले. एवढा माज आला कुठून? एवढी मस्ती आली कुठून? अहिल्यादेवींपेक्षा नातवाला मोठं समजता का? असा सवाल करत पडळकरांनी पवारांवर खालच्या पातळीची टीका केली आहे.
श्नी नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजचे मध्यस्थी वादापूर्वी आणि वादानंतर नाटक गाजले !
दरम्यान इंदापूरमध्ये या यात्रेदरम्यान पडळकर म्हणाले होते की, धनगर समाजाने एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडावं. समाज या एसटीडीच्या नादात किती दिवस गुरफटणार एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा असा टोला त्यांनी लागावला. तर पुढे ते म्हणाले की, यातून बाहेर पडाल तर तुम्ही राजा व्हाल. साहेब, ताई आणि दादा म्हणायचं सोडून द्या.