श्नी नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजचे मध्यस्थी वादापूर्वी आणि वादानंतर नाटक गाजले !

  • Written By: Published:
श्नी नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजचे मध्यस्थी वादापूर्वी आणि वादानंतर नाटक गाजले !

पुणे : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आयोजित रिजनल कॉन्फरन्स ऑफ मेडिएशन या कार्यक्रमांमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज (Shri Navlamal-Firodia-law-College) येथील विद्यार्थ्यांचा नाट्य ‘मध्यस्थी ‘वादापूर्वी आणि वादानंतर याचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते झाले. नाटक मध्यस्थीवादापूर्वी आणि वादानंतर यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

या नाटकाचे दिग्दर्शन जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, तर यासाठी मार्गदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी केले. यासाठी विशेष मार्गदर्शन मुख्य जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक , जिल्हा न्यायाधीश विकास कचरे , जिल्हा न्यायाधीश सच्चिदानंद अडाऊ यांनी केले . नाटकचा मूळ गाभा मेडिएशन याच्याशी संबंधित आहे. यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला.

या नाटकासाठी श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे चेअरमन अॅड. अशोक पलांडे आणि कॉलेजच्या प्राचार्या डॉ सुनिता आढाव यांचे विशेष सहकार्य लाभले. मुंबई उच्च न्यायालयाचे सुनील शिर्के, न्यायाधीश नितीन जमादार, न्यायाधीश अनुजा प्रभूदेसाई आणि न्यायाधीश भारती डांगरे यांची विशेष उपस्थिती होती . या नाटकासाठी कायदा सल्ला केंद्राच्या समन्वय सहाय्यक प्राध्यापक अनिता आहेर यांनी मध्यस्थीबद्दल मुलांना मार्गदर्शन केले . या नाटकाचे नेपथ्य डॉ. गंगा रेशमी यांनी केले. तर शिक्षक समन्वयक म्हणून डॉक्टर ऐश्वर्या यादव यांनी काम पाहिले.

या नाटकाचे लेखन स्नेहा गुंड यांनी केले होते. विद्यार्थी दिग्दर्शक अॅड. प्रणव जोशी यांनी सहभाग नोंदवला. समाजाची जाण ठेवून मेडिएशनकडे वाढणारा कल या नाटकातून दिसून आला. या नाटकासाठी न्यायाधीशांची भूमिका अनुष्का पानसरे यांनी केली. नाटकांमध्ये मोठे काका आणि मकरंद भूमिका प्रणव जोशी यांनी तर अभिवक्ता म्हणून या नाटकांमध्ये ऋग्वेद महेंद्र गंधे , निहाली मोकाक्षी , संदेश जाधव यांनी काम केले.

मध्यस्थची भूमिका स्नेहा गुंड आणि विशाल थोपटे यांनी साकारली आहे. त्याचबरोबर आई म्हणून साक्षी कातनेश्वरकर, मोठा भाऊ आर्यन जाधव, छोटा भाऊ चैतन्य देशपांडे, मोठी सून साक्षी गुजराती आणि छोटी सून समृद्धी कांचन या होत्या. व्यवस्थापन कर्मचारी म्हणून तेजस दाबुगडे आणि विशाल राणे यांनी उत्तम भूमिका साकारली .


नाटक कशावर ?

या नाटकात कुटुंबामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीचा वादकोर्टापर्यंत गेल्याचे दाखवले गेले. त्यानंतरचे प्रकरण कोर्टाने मध्यस्थी केंद्राकडे समझोता होण्यासाठी पाठवले. या पूर्ण प्रक्रियेमध्ये मध्यस्थी कशाप्रकारे काम करतो आणि कुठल्या कुठल्या प्रक्रियेला मध्यस्थीच्या वेळी सामोरे जावे लागते हे पाहता आले. प्रकाश व्यवस्थापन पुष्कर पांडे आणि निर्मिती धर्माधिकारी, तर बॅक स्टेजला सृष्टी दुबे, अन्वय भिडे, मधुरा न्याते आणि जानवी देशमुख यांनी काम पाहिले. सदर नाटकाला उपस्थित सर्व न्यायाधीशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमांमध्ये एक हजार पेक्षा जास्त न्यायाधीश, विविध विधीतज्ज्ञ आणि विधी संबंधित लोक उपस्थित होते होता. हा कार्यक्रम पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube