Download App

72 Hoorain : दहशतवाद अन् ७२ कुमारिका मुली…; ‘७२ हूरें’, धमाकेदार टीझर प्रदर्शित

72 Hoorain: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमावरून सध्या संपूर्ण देशभरात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता दहशतवादावर (Terrorism) आधारित आणखी एक सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. ‘७२ हूरें’ (72 Hoorain) या सिनेमाचा टीझर रिलीज (Teaser release) करण्यात आला आहे. हा सिनेमा ७ जुलै २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=LthTIHbokwQ

दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान (Directed by Sanjay Pooran Singh Chauhan) यांच्या ‘७२ हूरें’ सिनेमाच्या ५२ सेकंदाच्या टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अझहर, हाफिज सईद आणि सादिक सईद यांसारख्या दहशतवाद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच अतिरेक्यांच्या नेत्यांची चिथावणीखोर भाषणाची पार्श्वभूमी या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.

या टीझरमध्ये दहशतवाद्यांना, “तुमच्या मृत्यूनंतर जन्नतमध्ये ७२ कुमारिका मुली तुमच्या सेवेत राहतील” असे आश्वासन दिले जात असल्याचे देखील उल्लेख करण्यात आला आहे. ‘७२ हूरें’ सिनेमाचा टीझर रिलीज होताच, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक युजर्सनी “‘द केरला स्टोरी’नंतर आणखी एक प्रोपगंडा सिनेमा…” अशा प्रतिक्रिया देत आहेत, तर काहींनी या सिनेमाच्या टीझरला समर्थन दर्शवले आहे.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

यासंदर्भात “दहशतवाद हा जगभर चिंतेचा विषय बनला आहे. परंतु हे दहशतवादी कोणत्याही इतर ग्रहाचे नाहीत, त्यांचा ब्रेनवॉश केल्यामुळे ते जिहादच्या नावाखाली दहशतवादाचा मार्ग पत्करत असल्याचा” दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. ‘७२ हुरें’च्या आमिषाने तरुणाईला कोणत्या पद्धतीने दिशाभूल करण्यात येत आहे. हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, असेही निर्मात्यांनी यावेळी सांगितले आहे.

या सिनेमाची निर्मिती अशोक पंडित यांनी केली आहे, याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. हा सिनेमा ७ जुलै २०२३ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us