72 Hoorain च्या ट्रेलरचा वाद चिघळला! नेमकं काय आहे प्रकरण?

72 Hoorain : ‘७२हुरैन’ (72 Hoorain) या चित्रपटाची घोषणा झाल्यावर हा चित्रपट खूपच चर्चेत आला आहे. चित्रपटरिलीज होण्याअगोदरच या चित्रपटाचा ट्रेलर चांगलंच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डाने (CBFC) सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाने निर्माते चांगलेच हैराण झाल्याचे दिसून येत आहे. ‘72 HOORAIN’ TRAILER OUT NOW… Team #72Hoorain […]

72 Hoorain

72 Hoorain

72 Hoorain : ‘७२हुरैन’ (72 Hoorain) या चित्रपटाची घोषणा झाल्यावर हा चित्रपट खूपच चर्चेत आला आहे. चित्रपटरिलीज होण्याअगोदरच या चित्रपटाचा ट्रेलर चांगलंच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डाने (CBFC) सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाने निर्माते चांगलेच हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या काही दिवसांपूर्वी ‘७२ हुरैन’ या सिनेमाची घोषणा झाली होती. धर्मांतरण, दहशतवादी संघटना आणि निष्पाप लोकांचे ब्रेनवॉश करुन त्यांच्याकडून दहशतवादी काम कसं करुन घेतलं जातं, अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा ‘७२ हुरैन’ हा सिनेमा आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर पास करण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. त्यांनी या सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे.

‘७२हुरैन’च्या ट्रेलरमधून ‘कुराण का’ शब्द वगळण्यास आणि बॉम्बस्फोटाच्या दृश्यात तुटलेला पायाचा व्हिडिओ काढण्याचे सेन्सॉर बोर्डाने आदेश दिले होते. परंतु आता सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य अशा मुद्द्यांवर मोठा वाद सुरू झाला आहे. यामुळे आता ‘७२हुरैन’ या चित्रपटाचे निर्माते हैराण झाले आहेत, आता ते सेन्सॉर बोर्डाच्या वरिष्ठांची भेट घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट न दिल्याने ‘७२हुरैन’ हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होऊ शकणार नाही. तसेच आज निर्मात्यांनी डिजिटल पद्धतीत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ‘७२हुरैन’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा पूरण सिंह यांनी सांभाळली आहे. त्यांना आजपर्यंत दोनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. किरण डागर, गुलाब सिंह तन्वर, अनिरुद्ध तन्वर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच अशोक पंडित या बहुचर्चित चित्रपटाचे सहनिर्माते राहिले आहेत.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

‘७२हुरैन’च्या टीझरमध्ये ओसाम बिल नादेन, अजमल कसाब, याकूब मेनन, मसूद अझहर, हाफिज सईद, सादिक सईद, बिलाल अहमद आणि हकीम अली यांसारख्या अनेक दहशतवाद्यांची नावं या टीझरमध्ये घेतले आहेत. परंतु आता सेन्सॉर बोर्डाने ‘७२ हुरैन’च्या प्रदर्शनावर बंदी घातले आहेत, तसेच निर्माते आता पुढे काय पाऊल उचलणार आणि या चित्रपटाच्या कमाईवर या सर्व गोष्टींचा काय परिणाम होणार आहे हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version