दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ मल्याळम अभिनेते श्रीनिवासन यांचे वयाच्या 69 वर्षी निधन
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर. ज्येष्ठ मल्याळम अभिनेते श्रीनिवासन यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन.
Veteran Malayalam actor Srinivasan passes away at the age of 69 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मल्याळम अभिनेते श्रीनिवासन(Shrinivasan) यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले आहे. श्रीनिवासन यांनी जवळपास 4 दशके आपल्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. एका दिग्गज अभिनेता असण्यासोबतच, श्रीनिवासन एक प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक देखील होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 225 हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून चाहत्यांची मनं जिंकली. त्यांच्या निधनानं मल्याळम(Malayalam)चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून श्रीनिवासन यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
श्रीनिवासन हे एक असे कलाकार होते की, जे अभिनयाव्यतिरिक्त चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिण्यापासून तर त्याचं दिग्दर्शन करण्यापर्यंतची जबाबदारी देखील पार पाडायचे. त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरूवात केली. नंतर ते अभिनयाकडे वळाले. त्यांच्या दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या “वडक्कुनोक्कियंथ्रम” आणि “चिंतविष्टय श्यामला” या चित्रपटांनी लक्ष वेधले. “वडक्कुनोक्कियंथ्रम” ला केरळ राज्य सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर “चिंतविष्टय श्यामला” ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
अभिनय आणि दिग्दर्शनाव्यतिरिक्त, श्रीनिवासन यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट देखील लिहिले जे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. यामध्ये “ओदारुथम्मवा आलरियाम,” “सन्मानसुल्लावर्क्कू समाधानम,” “पट्टणप्रवेशम,” “संदेसम,” “नादोदिकट्टू,” “गांधीनगर 2रा स्ट्रीट,” “ओरू मारवाथूर कनावू,” “उदयनू थरम,” आणि “कथा परायम्पोल” सारख्या क्लासिक्सचा समावेश आहे. श्रीनिवासन यांना त्यांच्या शानदार कारकिर्दीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन फिल्मफेअर दक्षिण पुरस्कार आणि सहा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले.
