पुण्यात महाविकास आघाडीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गडाला सुरुंग; आमदाराच्या मुलासह 22 जणांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गडाला पुण्यात भाजपकडून सुरुंग.

  • Written By: Published:
Untitled Design (128)

22 people, including Pune MLA’s son, join BJP : राज्यात सगळीकडेच महापालिका निवडणुकीचे वारे पाहायला मिळत आहेत, निवडणुकीसाठी येत्या 2 दिवसांत अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार असून त्याआधीच भाजपने(BJP) मास्टरस्ट्रोक टाकलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackrey), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar) पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीच्या गडाला पुण्यात भाजपकडून सुरुंग लावण्यात आला आहे. या सर्व पक्षांतील एक दोन नाही तर तब्बल 22 जणांनी आज मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित होते. 2 दिवसांपूर्वीच हा प्रवेश होणार होता. मात्र काही कारणास्तव हा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. आज हा प्रवेश झाला असून पुण्यातील तब्बल 22 नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई महापालिकेच्या जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा; 77 जागांवर दोघांकडूनही दावा

तब्बल 22 नेत्यांचा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही दिग्गजांचा देखील समावेश आहे. वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, सायली रमेश वांजळे, विकास दांगट, नारायण गलांडे, माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव कणव चव्हाण, खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी ढोले, संतोष मते, प्रशांत तुपे, विराज तुपे, अनिल तुपे, इंदिरा तुपे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे मुळशीमधील भानुदास पानसरे, गणेश पानसरे, संतोष पानसरे, कृष्णकुमार पानसरे, आनंद माझिरे, सुहास पानसरे, किरण साठे आणि सचिन पानसरे यांनी देखील यावेळी प्रवेश केला आहे.

follow us