A beautiful glimpse of innocent childhood curiosity: the second song from ‘Little Thomas’ has been released : आठवतंय का, लहानपणी आपल्याला हे जग असंख्य प्रश्नांनी भरलेलं वाटायचं आणि मोठी माणसं देत असलेली उत्तरं काही केल्या समजायची नाहीत? ‘लिटिल थॉमस’ हा चित्रपट पुन्हा एकदा बालपणीचं तेच निरागस कुतूहल आणि आश्चर्य रुपेरी पडद्यावर जिवंत करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अभिषेक विचारे यांच्या The Girl Who Waited For Love’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
गुलशन देवैया आणि रसिका दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या आगामी चित्रपटातील दुसरं गाणं ‘Adults Wrong Hai’ जुंगली म्युझिकच्या (टाइम्स म्युझिकचा एक भाग) माध्यमातून रिलीज करण्यात आलं आहे. सात वर्षांच्या एका मुलाच्या कुतूहलपूर्ण विचारविश्वाची आणि त्याच्या निरागस जगाची गोड झलक या गाण्यात पाहायला मिळते. शैलेंद्र बर्वे यांनी या गाण्याला संगीत दिलं असून अनुपम बर्मन यांनी ते गायलं आहे. रंजन सिंह आणि इयागो यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. जगात मुलं नेमकी कुठून येतात, याचं उत्तर शोधण्याचा एका छोट्या मुलाचा निरागस प्रयत्न या गाण्यातून मांडण्यात आला आहे.
इंडिया आघाडीच्या मोर्चावर फडणवीसांचा पलटवार; ‘विरोधकांना संविधानिक संस्था डिस्क्रेडिट करायच्या आहेत’
मोठ्यांच्या गुंतागुंतीच्या गोष्टी आणि किचकट तर्कांपासून दूर, छोटा थॉमस आपल्या आजूबाजूच्या मोठ्या माणसांकडून मिळणाऱ्या संदिग्ध उत्तरांवर प्रश्न उपस्थित करतो. अखेरीस आपल्या निरागस हट्टातून तो एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो—मोठी माणसं चुकीची आहेत! मस्ती, विनोद आणि भावनांनी भरलेलं हे गाणं सात वर्षांच्या वयातील निरागस शंका आणि कुतूहल अतिशय सुंदरपणे मांडतं. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या बालपणीच्या आठवणींशी त्याची नाळ जोडलेली जाणवू शकते. मुलांच्या उत्साही सामूहिक गायनासोबतच ध्वनिक वाद्यांच्या संगीतामुळे हे गाणं अधिकच गोड आणि जिवंत वाटतं.
सौरभ कुंडलिक यांच्या कामाची दखल थेट भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लागली वर्णी
‘लिटिल थॉमस’चं लेखन आणि दिग्दर्शन कौशल ओझा यांनी केलं आहे. ल्यूमिनोसो पिक्चर्स, सिविक स्टुडिओज, गुड बॅड फिल्म्स आणि फ्लिप फिल्म्स या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अनुष्का शाह, राजनिकांत ओझा, चारु ओझा, रंजन सिंह आणि अनुराग कश्यप हे चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘Adults Wrong Hai’ हे गाणं आता सर्व प्रमुख ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ टाइम्स म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. ‘लिटिल थॉमस’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
