Rohit Pawar: रोहित पवार यांनी लाँच केलेलं रॅप साँग तरुणाईच्या ओठांवर

Rohit Pawar Rap Song Launch: राज्याचे भविष्य असलेल्या जवळपास ६० टक्के लोकसंख्या असलेल्या युवा वर्गाला राज्याच्या धोरणनिर्मिती प्रक्रियेत कसे योगदान देता येईल हा विचार डोळ्यासमोर ठेऊन आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम‘ (Maharashtra Vision Forum) ही प्रभावी युवा चळवळ सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणी आणी युवा रॅपर्स यांच्यामध्ये […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T221552.359

Rohit Pawar

Rohit Pawar Rap Song Launch: राज्याचे भविष्य असलेल्या जवळपास ६० टक्के लोकसंख्या असलेल्या युवा वर्गाला राज्याच्या धोरणनिर्मिती प्रक्रियेत कसे योगदान देता येईल हा विचार डोळ्यासमोर ठेऊन आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम‘ (Maharashtra Vision Forum) ही प्रभावी युवा चळवळ सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणी आणी युवा रॅपर्स यांच्यामध्ये जरा वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. अशातच रॅपच्या माध्यमातून तरुणाईला महाराष्ट्र व्हिजन फोरम या युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाबद्दल सांगण्यात आले आहे. अनेकवेळा रॅप म्हटलं की शिव्या, अर्वाच्य भाषा असे दिसते.

परंतु महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या या रॅपमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने शब्द मांडणी करून उपक्रमाचा उद्देश आणि एकंदर संपूर्ण संकल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्तम संगीत आणि शब्दांच्या बांधणीमुळे सध्या तरुण वर्गात या रॅपचा बोलबाला दिसून येत आहे.

रॅप पाहण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करा

युवांना त्यांच्या राज्याच्या विकासाबद्दल काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा थेट सरकारपर्यंत पोचवता येत आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये महाविद्यालयात जाऊन आमदार रोहित पवार हे तरुणाईशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना अगदी मनमोकळी उत्तरे देखील देत आहेत. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक युवांनी या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

तरुणाईच्या सध्याच्या जगातील ट्रेण्ड लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र व्हिजन फोरम युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाचे रॅप सॉंग लॉन्च केले आणि अल्पावधीतच ते व्हॉट्सॲप व इतरही समाज माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. शुभम जाधव अर्थात रॅाकसन या उभरत्या रॅपरने हे गाणे गायलेलं आहे.

Exit mobile version