Download App

Aparshakti Khuranaच्या नव्या गाण्याची खास पोस्ट; म्हणाला, ‘रिलीज करण्यापूर्वी…’

Aparshakti Khurana: आपल्या विनोदी टायमिंगने आणि उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांचे मने जिंकून घेणारा अभिनेता म्हणून बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुरानाला ओळखले जाते. (Social media) तसेच आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच तो रेडिओ जॉकी आणि अभिनेता आहे. ( New Song) तो उत्तम गिटार देखील वाजवतो. तो चांगला गायक आणि क्रिकेटर असा अष्टपैलू अभिनेता अपारशक्ती खुराणा याला ओळखले जाते.


अपारशक्ती खुराणा ‘स्त्री’ आणि ‘लुक्का छुप्पी’ या सारख्या सिनेमामधील त्यांच्या उत्कृष्ट विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने ‘ज्युबिली’ या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये अफलातून कामाने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. मदन कुमार या भूमिकेसाठी प्रेक्षकांचं प्रेम मिळवल. अभिनयाच्या पलीकडे तो एक उत्तम प्रतिभावान संगीतकार म्हणून देखील आपली चमक दाखवत असतो. अलीकडेच त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच त्याने त्या व्हिडिओला ‘माझं पुढचं गाणं रिलीज करण्यापूर्वी फक्त वॉर्म अप करत आहे, अशी खास पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले आहे.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

तसेच अपारशक्ती खुरानाचा आगामी संगीत व्हिडिओ हा नक्कीच काहीतरी खास असणार यात काही शंका नाही. आकर्षक टीझरमध्ये त्याचा करिष्मा आणि संगीत या दोघांचा उत्तम मिलाफ बघायला मिळत असतो. मधुर सुरांची आणि व्हिज्युअल्सची सगळेच आता आतुरतेने वाट पाहत असतात. ‘बर्लिन’, ‘फाइंडिंग राम’ नावाचा अॅप्लाज एंटरटेनमेंटचा माहितीपट आणि ‘स्त्री 2’ अश्या अनेक उत्तोत्तम प्रोजेक्टमधून तो बघायला मिळणार आहे.

Nana Patekar: ‘अंत्यसंस्काराची लाकडं तयार…’; मृत्यूविषयी नाना पाटेकरांचं ते वक्तव्य चर्चेत

तसेच अपारशक्तीला अभिनयाची ही खूप आवड आहे. त्यादृष्टीने नंतर त्याने अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते. बॉलिवूडचा परफेक्शनिस्टअभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ या सिनेमातून अपारशक्तीने अभिनयात पदार्पण केले होते. हा सिनेमा 2016 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केली होती.

Tags

follow us