Nana Patekar: ‘अंत्यसंस्काराची लाकडं तयार…’; मृत्यूविषयी नाना पाटेकरांचं ते वक्तव्य चर्चेत

Nana Patekar: ‘अंत्यसंस्काराची लाकडं तयार…’; मृत्यूविषयी नाना पाटेकरांचं ते वक्तव्य चर्चेत

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीमधील एक ज्येष्ठ अभिनेते आहेत. (Social media) नाना पाटेकर यांची भूमिका असलेला ‘व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नाना पाटेकरांनी या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळीपासून (Sanjay Leela Bhansali) ते आगामी सिनेमा कोणता  करणार? याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nana Patekar (@iamnanapatekar)


यावेळी त्यांनी केलेल्या एका एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधलं असल्याचे बघायला मिळत आहे. स्मशानात लागणारी लाकडं गोळा करुन ठेवली आहेत, असं त्यांनी यावेळी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावले आहेत. आपण आपल्याला आवडेल ते काम करायचे. तुम्हाला वाटतं जे की जे छान करु शकतो, तेच काम आपण करत राहायचं. नाहीतर तुमच्याकडून सरधोपट काम होतं. माझं फार छान होतं किंवा होतच असं काही नाही. परंतु मी प्रयत्न करत असतो.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

विवेक अग्निहोत्रीला मी एक सवाल देखील केला होता की, या भूमिकेकरिता तुम्ही मलाच का घेतल? यावर तो मला म्हणाला की, इंडिया कॅन डू इट हे वाक्य तुम्ही उच्चाराल तेव्हा लोक मानणार आहेत. मला त्याचा आनंद वाटला असे यावेळी नाना पाटेकर यांनी म्हटले. तसेच ‘व्हॅक्सिन वॉर’ ही रिसर्च ओरिएंटेंड फिल्म आहे. मी या सिनेमामध्ये अभिनय करत आहे, याचा मला खूप आनंद असल्याचे देखील यावेळी नाना म्हणाले आहेत.

तसेच मला माहित आहे की, एक दिवस माझा मृत्यू होणार आहे. माझा यावर विश्वास आहे. त्यासाठी मी मला कमाई, प्रसिद्धी, आपल्याला या सर्व गोष्टी कसं मिळणार? या गोष्टींत काही देखील रस उरला नाही. जे लोक असा विचार करत असतात की, आम्ही मरणारच नाही ते सगळं साठवत राहत असतात, आणखी कसं मिळेल याचा विचार करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. परंतु मला माहित आहे की, माझ्या मृत्यूनंतर मला १२ मण लाकडं लागणार आहेत. आणि तेवढीच लागणार आहेत. ती माझी अखेरची मालमत्ता राहणार आहे. मी माझ्या सिनेमात देखील हा संवाद वापरला आहे.

हिंदी भाषेवरून Prakash Raj यांची अमित शाहांवर जोरदार टीका; यावर कंगनाने थेट म्हणाली…

तसेच मैने अपनी लकडी जमाँ कर के रखी है.. मी खरंच लाकडं गोळा करुन ठेवली आहेत. तर मी त्याला म्हणतो, ‘बेटे मैने अपनी लकडी जमा कर रखी है.. और वो सुखी लकडी है. तुम भी गिली लकडी इस्तेमाल मत करना. लोग जमा होंगे..धुआँ आयेगा दोस्त लोग, अगलबगल के लोगोंके आँखमे जाएगा और मरते वक्त गलतफैमी होगी मेरे लिये रो रहें है.’ हे आयुष्याचं सध्याच वास्तव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच मृत्यूनंतर कुणीही तुम्हाला नंतर लक्षात ठेवत नसल्यचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube