A strong global platform for Marathi entertainment Uday Samanta announces Abhijat Marathi OTT : मराठी भाषिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषिकांचा आनंद गगनात मावत नाहीय. त्यानंतर आता आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे मराठी भाषा मंत्रालय आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अभिजात मराठी या आगामी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली आहे. ‘अभिजात मराठी OTT’ असं या प्लॅटफॉर्मचं नाव आहे.
धक्कादायक! दागिने चोरण्यासाठी नातवांकडूनच आजीचा खुन, तोडले कानही तोडले
अभिजीत मराठी यामधील अभिजात मधील आणि मराठी मधील म या दोन आद्याक्षरांमधून या ओटीपी प्लॅटफॉर्मचा लोगो बनवण्यात आला आहे ज्याचा अनावरण आज सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. ॲमेझॉन हे एकमेव ॲप आहे जे मराठी सिनेमा प्रदर्शित करतो मात्र मराठी निर्मात्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही. त्यासाठी मराठी निर्मातांना आणि मराठी प्रेक्षकांना एक मराठी ओटीपी प्लॅटफॉर्म हवा. ही गरज ओळखून हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आलं.
GST Collection April 2025 : GST संकलनाचे सर्व विक्रम मोडले, एप्रिलमध्ये 2.37 लाख कोटी जमा
उदय सामंत यांना प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं.दरम्यान यावेळी या प्लॅटफॉर्म बद्दल बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की जर प्रत्येकाच्या हातात मराठी ओटीपी प्लॅटफॉर्म असेल तर मराठीच्या संवर्धनासाठी मदत होईल. तसेच भाषेचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. मराठी साहित्य हे पुढच्या पुढे पर्यंत पोहोचू शकतं. त्यामुळे हा ओटीपी प्लॅटफॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे.