रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी! स्टार प्लसवर पुन्हा एकदा दमदार मालिकांचा महासंगम

series on Star Plus देशमुख महासंगम घडणार आहे जिथे दोन वेगवेगळ्या जगांचा संगम एकाच छताखाली होणार आहे.

Series On Star Plus

Series On Star Plus

A treat for the avid viewers! Once again, a great confluence of powerful series on Star Plus : टेलिव्हिजनच्या दुनियेत कायमच चर्चेत असलेल चॅनल म्हणजे स्टार प्लस या चॅनलने नेहमीच आपल्या रोमांचक महासंगम भागांमधून मालिकेतील कुटुंबांना एकत्र आणलं आहे आणि यावेळी हा अनुभव आणखी मोठा दमदार आणि हाय-व्होल्टेज ड्रामाने भरलेला असणार आहे.

Video : भोंदूबाबा खरात प्रकरण मिटवण्यासाठी दुसरं प्रकरण.., उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आता स्टार प्लस वर पुन्हा एकदा दमदार मालिकांचा महासंगम घडणार असल्याचं कळतंय. स्टार प्लस ने प्रेक्षकांना नव्या महासंगमाची झलक दिली असून देशमुख महासंगम घडणार आहे जिथे दोन वेगवेगळ्या जगांचा संगम एकाच छताखाली होणार आहे. ” उडने की आशा” मधील सचिन आणि सायली, “मिस्टर अँड मिसेस परशुराम” मधील शिवप्रसाद आणि शालिनी यांच्यासोबत हा खास महासंगम होणार आहे.

‘तुमच्यावर कोप होईल’ची गर्जना देत थयथयाट; नंतर पोलिसी खाक्या दाखवताच नमला खरात

देशमुख कुटुंबातील चुलत भावंडं म्हणून त्यांचं हे एकत्र येणं हे रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.सुरुवातीला साधं आणि उबदार वाटणारं कौटुंबिक वातावरण लवकरच अनपेक्षित वळण घेतं. प्रोमोमध्ये या उभ्या राहणाऱ्या वादळाची झलक दिसते जिथे शब्द फक्त बोलले जात नाहीत तर ते चिथावणीही देतात.

डिजीटल अरेस्टवर सरकारचा सर्जिकल स्ट्राइक! व्हाट्स अ‍ॅपवरील ‘ते’ अकाऊंट्स बंद केले जाणार

या तणावपूर्ण वातावरणात एक रोचक क्षण उलगडताना दिसतो. शिवप्रसाद आणि सचिन काहीतरी मोठ्या तयारीत दिसतात त्यांच्या सोबत शालिनी आणि सायली त्यांना तयार करताना दिसतात. पण कशासाठी? अहंकारांचा संघर्ष? की अजून काही अधिक तीव्र? प्रत्येक नजर एक आव्हान घेऊन येते. प्रत्येक शब्दामागे खोल संघर्षाची चाहूल लागते आणि प्रत्येक क्षण प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

भोंदू बाबा अशोक खरात ठरला ‘निमित्त’; चाकणकरांच्या खुर्चीला सुरुंग नेमका लावला कुणी?

अशा ताकदीच्या व्यक्तिमत्त्वांचा संगम हा उत्कंठावर्धक असणार याची खात्री करुन देते. नात्यांची कसोटी लागणार असून हा महासंगम आधी कधी न पाहिलेला महा संगमा पेक्षा अधिक रोमांचकारी ठरणार यात शंका नाही. देशमुख चुलत भावंडं समोरासमोर आल्यावर त्यांचं नातं अधिक घट्ट होईल की सगळं काही गोंधळात बदलेल?

Exit mobile version