Download App

कोण आहेत रंगा-बिल्ला?, लवकरच येणार वेब सिरीज, ‘हे’ प्रसिद्ध चेहरे साकारणार भूमिका

रंगा-बिल्ला केस ही घटना 1978 मधली आहे, जेव्हा दोन भावांकडून भाऊ-बहीण असलेल्या गीता आणि संजय चोप्रा यांचे अपहरण करण्यात आले.

  • Written By: Last Updated:

Web Series on Ranga Billa : दिल्लीत गाजलेल्या रंगा-बिल्ला मर्डर केसवर अधारित वेब सिरीज येत आहे. (Series)  दिल्लीत शूटिंग सुरू आहे. अभिनेता अली फज़ल आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यामध्ये असणार असून या वेब सिरीजचं दिग्दर्शन ‘पाताल लोक’साठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक प्रोसित रॉय करत आहेत. रंगा-बिल्लाच्या गुन्हेगारी कृत्यावर आधारित ही वेब सिरीज ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

रंगा-बिल्ला केस ही घटना 1978 मधली आहे, जेव्हा दोन भावांकडून भाऊ-बहीण असलेल्या गीता आणि संजय चोप्रा यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. या मुलांना कुलजीत सिंग उर्फ रंगा आणि जसबीर सिंग उर्फ बिल्ला यांनी अपहरण केले होते. सुरुवातीला त्यांची योजना कार चोरीची होती, पण कारमध्ये मुले पाहून त्यांनी आपला प्लॅन बदलला. या केसने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते आणि देशभर संतापाची लाट उसळली होती.

मोठी बातमी, बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकला दुबईत अटक

या घटनेनंतर मुलांच्या सुरक्षेसाठी आणि अपहरणासंबंधीच्या कायद्यात कडक बदल करण्यात आले. ही वेब सीरिज या गुन्ह्याच्या खोलपणाला, त्याच्या परिणामांना आणि नंतरच्या तपास प्रक्रियेला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जरी निर्मात्यांनी अजून या कथेबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार ही मालिका सत्य घटनांवरच आधारित आहे.

दिल्लीत या सीरिजचं शूटिंग सुरू झालं असून ही मालिका मुख्यत्वे त्या मर्डर केसनंतर काय काय घडलं यावर लक्ष केंद्रित करणार आहे. हे सगळं अतिशय संवेदनशीलतेने दाखवले जात आहे आणि हेतू असा आहे की हा केस दिल्लीत किती मोठा प्रभाव टाकून गेला हे दाखवायचं. सध्या दिल्लीत विविध भागांत शूटिंग सुरू आहे. हे पहिल्यांदाच आहे की रंगा-बिल्ला केसवर आधारित एक स्क्रिप्टेड वेबसीरिज तयार केली जात आहे.

follow us