Download App

सजना चित्रपटातील ‘आभाळ रातीला’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, रसिकांच्या हृदयाला दिला नवा स्पर्श

Aabhal Raatila Song from Sajna Movie Released : प्रेम, नाते संबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘सजना’ या चित्रपटातील (Sajna Movie) नवीन गाणं ‘आभाळ रातीला’ प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम ही भावना केवळ शब्दांतून नाही, तर सूरांतूनही अनुभवता येते. ‘आभाळ रातीला ’ (Aabhal Raatila) हे गाणं त्या प्रेमभावनेचा एक सुंदर अनुभव आहे. संस्कृतीच्या ठेव्याला उजाळा देणारा आणि परंपरेचा अभिमान जागवणारा हे गाणं आहे.

या गाण्यात ढोल-ताशाचा गगनभेदी नाद, लेझीमच्या तालावर अस्सल मराठी पोशाखामध्ये (Marathi Movie) नाचणारी तरुणाई आणि मुख्य अभिनेते आणि देवीच्या मंगलमय स्तुतीचा संगम रसिकांना अनुभवता येतो. शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटातील ‘आभाळ रातीला’ या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला.

VIDEO : सामना संपताच … कुलदीप यादवने मैदानातच रिंकू सिंगच्या कानशि‍लात लगावली, व्हायरल

गाण्याच्या चित्रीकरणात देखील मोठ्या मिरवणुका, ढोल-ताशाचे पथक आणि सजीव लेझीम नृत्य यांचा भव्य प्रदर्शन करण्यात आलं आहे. हे गाणे केवळ मनोरंजन नसून मराठी संस्कृतीच्या गाढ प्रेमाचा आणि परंपरेच्या जपणुकीचा एक सुंदर सोहळा आहे. ज्याच्या प्रत्येक ठोक्यातून मराठी अस्मिता झळकते.

सुहास मुंडे यांच्या शब्दरचनेमुळे गाण्यात प्रेमभावना अधिक खुलून आल्या आहेत. गाण्याचे चित्रीकरण सुद्धा अतिशय नयनरम्य आहे. ह्या गाण्याचे संगीतकार ओंकारस्वरूप हे आहेत. तर गायक आदर्श शिंदे आणि राजेश्वरी पवार हे आहेत.

पंतप्रधान मोदींची बेठक संपताच पाकिस्तानला हादरा; मध्यरात्री दीड वाजता घेतली पत्रकार परिषद

‘सजना’ चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, या गाण्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. शशिकांत धोत्रेंचा हा पहिलाच रोमँटिक सिनेमा आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. ‘सजना’ सिनेमा 23 मे 2025 पासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.

 

follow us