New Marathi Song: काळजाचा ठाव घेणार ‘काटा किर्र’ ‘लावण्यवती’ अल्बमचे अखेरचे गाणे भेटीला

New Marathi Song: काळजाचा ठाव घेणार ‘काटा किर्र’ ‘लावण्यवती’ अल्बमचे अखेरचे गाणे भेटीला

Avadhoot Gupte New Marathi Song: एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ (Lavanyavati) या अल्बममधील ‘गणराया’ , ‘करा ऊस मोठा’, ‘लावा फोन चार्जिंगला’ या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील ‘काटा किर्र’ (Kata Kirr) हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईननुसार या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)


अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि संगीत दिलेल्या ‘काटा किर्र’ या गाण्याला मुग्धा कऱ्हाडेच्या ठसकेबाज आवाज लाभला आहे. तर अभिनेत्री पूर्वा शिंदेच्या बहारदार नृत्याला ऋषी देशपांडेची साथ लाभली आहे. त्यामुळे यात अधिकच रंगत आली आहे. ‘काटा किर्र’चे नृत्य दिग्दर्शन ‘सुंदरीकार’ आशिष पाटील यांचे असून चैतन्य पुराणिक यांनी याचे छायाचित्रीकरण केले आहे.

नुकतचं या गाण्याचा प्रोमो भेटीला आला असून 26 डिसेंबरला हे लाजवाब गीत आपल्याला बघायला मिळणार आहे. ‘लावण्यवती’ अल्बमबद्दल अवधूत गुप्ते यांनी सांगितलं आहे की, ‘आपल्या महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे, यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो आणि म्हणून तुमच्यासाठी ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘काटा किर्र’ हे चौथे आणि शेवटचे गाणे तुमच्या भेटीला येणार आहे. हे गाणे खूप धमाल उडवून देणारे आणि प्रत्येकाला नक्की आवडेल अशी आहे.

Box Office: किंग खानला मागे टाकत ‘सालार’ने रचला नवा रेकॉर्ड; पाचव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

गेल्या काही दिवसांपासून अवधूतने राजकारणामध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मध्यंतरी अवधूत गुप्ते अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मंचावर झळकला होता. यामुळे तो लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याचे दिसत आहे. तसेच याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. अवधूतने सांगितले आहे की, मला कोणतीही निवडणूक आली की विचारणा होते. यामुळे मी राजकारणामध्ये एन्ट्री करणार आहे हे आता जाहीरच करुन टाकतो. जेव्हा काही मिळवायचं नाही किंवा काही गमवायचं नाही अशा वेळी मी राजकारणामध्ये येणार असल्याचे भाष्य अवधूतने केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube