Download App

Ira Khan Wedding: आमिरची लेक आयरा बांधणार लग्नगाठ? लग्नाची तारीख आली समोर

Ira Khan Wedding: चाहत्यांचा लाडका अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) ही सध्या जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमिर खानच्या लेकीने गुपचूप साखरपुडा उरकला होता. तिने तिचा बॉयफ्रेंड (boyfriend) आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) साखरपुडा (Ira Khan Wedding) केल्याचे बघायला मिळाले होते. (Social media) या दोघांच्या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत होते.


आता आयरा आणि नुपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयरा आणि नुपूर ३ जानेवारी दिवशी कोर्ट मॅरेज करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. परंतु अद्याप याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या कार्यक्रमात आयरा आणि नुपूच्या कुटुंबामधील सदस्य आणि त्यांचे मित्र सहभागी होणार आहेत. पंरतु बॉलीवूडमधील कोणताही कलाकाराला या कार्यक्रमा आमंत्रण नसल्याचं सांगण्यात येत आहे. आयरा आणि नुपूरचे कुटुंबीयांनी लग्नाच्या जोरदार तयारीला सुरुवात केल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होती. नुपूर हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींना तो फिटनेस ट्रेनिंग देत असल्याचे बघायला मिळत असते.

Naseeruddin शाहांच्या वक्तव्यावर नाना पाटेकरांनी सुनावलं; म्हणाले, ‘राष्ट्रवादाच्या नावाखाली…’

गेल्या काही महिन्यापासून इटलीमध्ये झालेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्ये देखील तो सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्पर्धेच्या दरम्यान त्याने आयराला गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं होतं. आयराने अगदी हसत त्याला होकार दिल्याचे देखील बघायला मिळाले होते.

Tags

follow us