Download App

Aamir Khan: आमिरला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कोणी दिला? अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा!

Aamir Khan: आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट (MR Perfectionist) का म्हटलं जाऊ लागलं, याबद्दल स्वतः अभिनेत्याने त्याबद्दलचा किस्सा सांगितला.

Aamir Khan Got title of MR Perfectionist : कपिल शर्मा शोने (Kapil Sharma Show) पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर (Netflix) येऊन लोकांना वेड लावले आहे. पहिल्याचं एपिसोडमध्ये कपूर कुटुंबीयांनी हजेरी लावून शोची शोभा वाढवली आहे, तर शोच्या नंतरच्या भागांनी अनेकांना वेड लावले आहे. यावेळी कपिलच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अभिनेता आमिर खानला (Aamir Khan ) मिस्टर परफेक्शनिस्ट (MR Perfectionist) का म्हटलं जाऊ लागलं, याबद्दल स्वतः अभिनेत्याने त्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. यामुले अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


या शोमध्ये कपिलने आमिर खानच्या करिअर आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेल्या आमिर खानने सर्व प्रश्नांची थेट उत्तरे देताना पाहायला मिळाला. त्यापैकी एक प्रश्न जो आजपर्यंत अनेकांच्या मनात आला नसेल तो म्हणजे त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट हे नाव कसे पडले? कपिलने हा प्रश्न आमिर खानला विचारला आणि आमिरनेही थेट प्रतिक्रिया दिली. आमिर खानने सांगितले की, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांना ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग दिल्याचा खुलासा यावेळी केला.

आमिर खानने सांगितले की, ही घटना त्या दिवसात घडली, जेव्हा तो ‘दिल’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. या चित्रपटाचा कॅमेरामन बाबा आझमी (शबानाचा भाऊ) होता. एक दिवस ते बाबा आझमींच्या घरी चित्रपटाच्या कामासाठी गेले होते. सर्वजण चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल बोलत होते. त्यानंतर शबाना आझमी यांनी त्यांना चहामध्ये किती साखर घालायची हे विचारले. पण आमिर चित्रपटात इतका मग्न होता की त्याला शबानाचा प्रश्न समजायला थोडा वेळ लागला.

काही वेळानंतर आमिरला प्रश्न समजल्यावर त्याने शबाना आझमीकडे पाहत विचारले, ‘कप किती मोठा आहे?’ शबाना आझमी यांनी त्यांना कप दाखवला तेव्हा आमिर खानने परत त्यांना विचारले, ‘चमचा किती मोठा आहे?’ यानंतर आमिरने त्यांना चहामध्ये एक चमचा साखर घालण्यास सांगितले.

BMCM ची’ जादू ओसरली! 18 व्या दिवशी केली केवळ इतकी कमाई, ‘मैदान’ची अवस्था तर आणखी बिकट

आमिरने सांगितले की, यानंतर शबानाजींनी ही संपूर्ण घटना सर्वांना सांगितली की, जेव्हा तुम्ही आमिरला चहासाठी विचाराल, तेव्हा ते कप आणि चमचे पाहूनच चहामध्ये साखर किती आवश्यक आहे हे सांगू शकणार आहे आणि त्याच प्रकारे आमिरला चहा प्रत्येक ठिकाणी चहा मिळाल्याचे सांगितले. यामुळे अभिनेत्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग मिळाला असल्याचा खुलासा अभिनेत्याने केला आहे.

follow us

वेब स्टोरीज