Download App

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

Aamir Khan-Reena Dutt Divorce :बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खानने पुन्हा एकदा नैराश्याबाबत खुलासा केला आहे. तिने स्वत: या समस्येचा अनेकदा सामना केला आहे. यासोबतच ती आई-वडिलांच्या घटस्फोटावरही मोकळेपणाने बोलली आहे. जेव्हा तिचे वडील आमिर खान आणि आई रीना दत्ता यांचा घटस्फोट झाला तेव्हा त्याचा तिच्यावर कसा परिणाम झाला? तिने ही परिस्थिती कशी हाताळली? हे आयराने सांगितले.

इरा खानने अलीकडेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना या विषयावर चर्चा केली. इराने नुकतेच अगस्तु फाउंडेशन सुरू केले आहे. हे फाउंडेशन मानसिक आरोग्यासाठी मदत करणार आहे. दरम्यान, तिने स्वत:च्या आणि कुटुंबाच्या मानसिक आरोग्याबाबतही सांगितले.

PHOTO : साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीने छोटे कपडे न घालण्याची शपथ का घेतली होती, कारण ऐकून आश्चर्य वाटेल

आयरा खानला तिच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की तिला तिच्या वागण्यात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. ती अनेकदा रडायची. काही न खाता बरेच दिवस गेले. तेव्हा तिला काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आले.

आमिर खान आणि रीना दत्ताच्या घटस्फोटावर आयरा खान म्हणाली की, तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा तिच्यावर फारसा परिणाम झाला नाही. कारण हा दोघांचा परस्पर संमतीने निर्णय होता. पण नंतर आयराला नक्कीच समजले होते की काहीतरी गडबड आहे. अशा परिस्थितीत ती लगेच नेदरलँडहून भारतात आली.

Duleep Trophy 2023: सामना जिंकण्यासाठी वेळ वाया घातला? दुलीप ट्रॉफीच्या सेमीफायनलवरून वाद

आमिर खानची मुलगी नेदरलँडमध्ये शिक्षणासाठी गेली होती. पण डिप्रेशनमुळे ती खूप अस्वस्थ होती. अशा परिस्थितीत ती सर्व काही सोडून भारतात परतली होती. आयराने सांगितले की, ती दिवसभर काहीही न खाता किंवा न पिता झोपायची. एके दिवशी तिची आई रीना आपल्या मुलीला म्हणाली, ‘तू अशीच राहिलीस तर जिवंत राहायची नाहीस’

नैराश्यावर मात करण्यासाठी आयराने काय केले? यावर ती म्हणाला, ‘दर आठ-दहा महिन्यांनी मला मोठा धक्का बसतो. कदाचित ते अनुवांशिक आहे. काही मानसिक समस्या देखील आहेत. मला वाटते की आपल्या कुटुंबात मानसिक आरोग्य विकार आहे. पण घरच्यांनी मला नेहमीच साथ दिली त्यामुळे मी त्यावर मात करू शकते.

Tags

follow us