‘पठाण’मधील शाहरुख खानच्या लूकवर बिचुकलेचे मोठे विधान

साताराः अभिजीत बिचुकले यांच्या वक्तव्याची चर्चा कायमच होते. बिगबॉस फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पठाण चित्रपटातील शाहरूख खानच्या लूकबाबत अभिजित बिचुकले यांनी मोठे विधान केले आहे. तर सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना तो माझा भाऊ असल्याचे विधान बिचुकले यांनी केले. हिंदी बिगबॉसमध्ये असताना अभिजित बिचुकले आणि सलमान खानचे वादविवादाचे किस्से सर्वांना […]

Bichkule

Bichkule

साताराः अभिजीत बिचुकले यांच्या वक्तव्याची चर्चा कायमच होते. बिगबॉस फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पठाण चित्रपटातील शाहरूख खानच्या लूकबाबत अभिजित बिचुकले यांनी मोठे विधान केले आहे. तर सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना तो माझा भाऊ असल्याचे विधान बिचुकले यांनी केले.

हिंदी बिगबॉसमध्ये असताना अभिजित बिचुकले आणि सलमान खानचे वादविवादाचे किस्से सर्वांना माहित आहेत. त्यानंतर बिगबॉसमधून बाहेर आल्यावर देखील अनेकदा बिचुकलेंनी सलमान खानच्या विरोधात वादग्रस्त विधाने केली होती. सलमान खान माझा भाऊ आहे. आम्ही एकाच इंडस्ट्रीमधील आहेत. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असे बिचुकले म्हणाले.

तर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्या सध्या वादात सापडलेला पठाण चित्रपटावर ही अभिजित बिचुकले यांनी भाष्य केले. शाहरूखने या चित्रपटात जो लूक केला आहे. तो माझ्याकडे पाहून केला आहे. मी बिगबॉसमध्ये तशी हेअरस्टाइल केली होती. ती हेअरस्टाइल शाहरूखने कॉपी केली आहे. त्याबाबत एक ट्वीट आले आहे. ही माझ्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पूर्वी संजय दत्तची लाँग हेअरची स्टाइल होती. पण सध्या शाहरूखने केलेली स्टाईल ही माझी आहे. त्याने मला बिगबॉसमध्ये पाहिले असल्याचे विधान बिचुकलेने केली आहे.

Exit mobile version