Download App

तब्बल 20 वर्षांनंतर अभिजीतचं कमबॅक! ‘या’ मालिकेसाठी गायलं पहिलं वहिलं शीर्षक गीत

Abhijeet Savant आता अजून एक खास सरप्राईज घेऊन प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. अभिजीत अजून एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे.

Abhijeet Savant’s comeback after 20 years! First title song sung for the serial : इंडियन आयडॉल पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत आता अजून एक खास सरप्राईज घेऊन प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. अभिजीत अजून एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. हे फक्त गाणं नाही तर अभिजीत साठी हे गाणं खूप खास आहे असं तो सांगतोय. अभिजीतने आजवर अजरामर गाण्यांमधून प्रेक्षकांना मोहित केलं आणि एवढं नाही तर बॅक टू बॅक ट्रेंडिंग गाणी करून आता हे नवं कोर गाणं तो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे.

“कुर्ला टू वेंगुर्ला” चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीजर लाँच!

अभिजीत ने पहिल्यांदा मालिकेसाठी शीर्षक गीत गायल असून हे गाणं त्याचासाठी देखील तेवढंच खास आहे. पहिलं ते नेहमीच खास असतं आणि हे गाणं अभिजीत साठी एवढं स्पेशल का आहे आहे यावर बद्दल सांगताना अभिजीत सांगतो ” झी मराठी सारख्या वाहिनी साठी एखादं शीर्षक गीत करणं ही संधी खूप मोठी आणि महत्वपूर्ण आहे आणि माझं पहिलं वहिल मालिकेसाठीच टायटल ट्रॅक मी त्यांच्यासाठी करतोय ही गोष्ट माझ्यासाठी खास आहे. या इंडस्ट्रीत २० वर्ष पूर्ण करताना ही संधी मिळाली याचा आनंद तर आहे पण हे गाणं येऊन अगदीच काही दिवस झाले आणि प्रेक्षकांनी त्याला दिलेलं प्रेम बघून खूप छान वाटतं.

पुणे महापालिकेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; मंत्री मोहोळांचे पुतणे दु्ष्यंत मोहोळांना युवा मोर्चाची धुरा

उत्तम गाणं शब्दबद्ध होणं आणि त्या गाण्याला योग्य न्याय देऊन ते गाणं ही जवाबदारी असताना प्रेक्षकांनी त्याला दिलेलं प्रेम बघता आपल्याकडून काहीतरी नक्कीच उत्तम झालं याचं समाधान आहे.वीण दोघांतली तुटेना साठी गायलेल हे गाणं नक्कीच आठवणीत राहील यात शंका नाही” अभिजीतचा एव्हरग्रीन आवाज आणि गाण्याचे सुमधुर बोल यांची उत्तम सांगड असलेलं ” वीण दोघांतली तुटेना “ मालिकेचं शीर्षक गीत सोशल मीडिया वर देखील व्हायरल होताना दिसतंय.येणाऱ्या काळात अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मधून दिसणार असून फक्त मराठी नाही तर हिंदीत देखील तो उत्तम प्रोजेक्ट्स करणार असल्याचं कळतंय.

follow us