पुणे महापालिकेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; मंत्री मोहोळांचे पुतणे दु्ष्यंत मोहोळांना युवा मोर्चाची धुरा

पुणे महापालिकेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; मंत्री मोहोळांचे पुतणे दु्ष्यंत मोहोळांना युवा मोर्चाची धुरा

Pune Politics : आगामी पुणे महापालिकेसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी (Pune Politics) सुरू केली आहे. शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यानंतर धीरज घाटे शहर कार्यकारिणीत कुणाला संधी देणार याची चर्चा होती. धीरज घाटे यांनी नुकतीच पुणे शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे (Muralidhar Mohol) पुतणे दुष्यंत मोहोळ यांची भाजप शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची फेरनियुक्ती करण्यात आली. यानंतर घाटे यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली. यात विशेष म्हणजे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 22 जणांच्या कार्यकारिणीत फक्त 2 जु्न्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीत नवीन लोकांना संधी देण्यात येईल अशी चर्चा आधीपासूनच होती. ही चर्चा अखेरीस खरी ठरली आहे.

मुंबई महापालिकेसाठी अजितदादांची मोर्चेबांधणी; अनुभवी नवाब मलिकांना मोठी जबाबदारी

मंत्र्यांच्या निकटवर्ती असलेल्या कोथरूड आणि शिवाजीनगर येथील प्रत्येकी एका पदाधिकाऱ्याला कार्यकारिणीत पुन्हा संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या पदाधिकाऱ्यांची नियुक्त महत्वाची मानली जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेच कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

मिसाळ आऊट मोहोळ इन

या कार्यकारिणीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची एन्ट्री. मंत्री मोहोळांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांना पुणे शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. मागील कार्यकारिणीत राज्यातील मंत्री माधुरी मिसाळ यांचे पुत्र किरण मिसाळ यांच्याकडे शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. आता नव्या कार्यकारिणीत मात्र युवा मोर्चाची धुरा दुष्यंत मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

नव्याने जाहीर झालेली कार्यकारिणी अशी

पुणे शहर सरचिटणीस

पुनीत जोशी, रविंद्र साळेगावकर, विश्वास ननावरे, प्रियांका शेंडगे

पुणे शहर उपाध्यक्ष

शशीधर पुरम, सचिन मोरे, अर्जुन जगताप, संदीप दळवी, विठ्ठल बराटे, सुनील पांडे, मनोज खत्री, आनंद रिटे

पुणे शहर चिटणीस

राजू परदेशी, अनिल नवले, गणेश घुले, समीर रुपदे, अनुराधा एडके, संगिता गवळी, स्मिता खेडेकर, रुपाली धाडवे

पुणे शहर युवा मोर्चा

दुष्यंत मोहोळ

महिला सहमोर्चा अध्यक्ष

मनिषा लडकत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube