‘महाराष्ट्र दिनाच्या’ पूर्वसंध्येला मुरलीधर मोहोळ यांनी लाखो पुणेकरांना दिली आनंदाची बातमी

Muralidhar Mohol gave good news About Sinhgad Road Flyover On ‘Maharashtra Day’ : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘महाराष्ट्र दिनाच्या’ पूर्वसंध्येला लाखो पुणेकरांना दिली आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे आता पुणेकारांचा दैनंदिन प्रवास सुखकर होणार आहे. ही आनंदाची बातमी आहे. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुल लोकार्पणाबाबत सिंहगड रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होत आहे.याबाबत मोहोळ यांनी एक्स या सोशल मिडीया साईटवर माहिती दिली आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
पुणेकरांची आणखी एक स्वप्नपूर्ती; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे महाराष्ट्र दिनी लोकार्पण…
पुणे शहरात पायाभूत सुविधा आणि त्यातही वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने विविध पातळ्यांवर केलेल्या प्रयत्नांना यश येत असून महाराष्ट्रदिनी सिंहगड रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होत आहे.
पुणेकरांची आणखी एक स्वप्नपूर्ती; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे महाराष्ट्र दिनी लोकार्पण…
पुणे शहरात पायाभूत सुविधा आणि त्यातही वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने विविध पातळ्यांवर केलेल्या प्रयत्नांना यश येत असून महाराष्ट्रदिनी सिंहगड रस्त्यावरील… pic.twitter.com/GTqSjsyhkA
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 30, 2025
इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय घेणार मोठा निर्णय, 35 खेळाडूंना संधी, रोहित शर्मा कर्णधार?
माझ्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असताना तीन उडाणपुलांच्या संकल्पना मांडून त्यासाठी आर्थिक तरतूदही केली होती. नळस्टॉप येथील दुहेरी उड्डाणपूल, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल आणि कर्वेनगर ते सनसिटी हा मुठा नदीवरील पूल या तीन पुलांना आपण मंजुरी दिली होती. शिवाय सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात झाले होते. आपण संकल्प मांडलेल्या या पुलांपैकी दोन पूल आता पूर्णत्वास गेले असून तिसऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे.
सायबर वेलनेसच्या दिशेने महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक पाऊल, मुंबईत पहिले सेंटर सुरु
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल खुला झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांसह सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राजाराम पुलावरून थेट फनटाईम थेटरपर्यंत उड्डाणपुलावरून प्रवास करता येणार असून यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास आणि वेळेची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. सदरील काम विक्रमी वेळात पूर्ण केले गेले असून यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीने आणखी एक वचनपूर्ती पूर्ण केली असल्याचा आनंद निश्चितच आहे. असं मोहोळ म्हणाले आहेत.