सायबर वेलनेसच्या दिशेने महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक पाऊल, मुंबईत पहिले सेंटर सुरु

Maharashtra First Cyber Wellness Centre : Responsible Netism ने महाराष्ट्रातील पहिले सायबर वेलनेस सेंटर (Maharashtra First Cyber Wellness Centre) परळ, मुंबई येथील सावित्रीबाई फुले जेंडर रिसोर्स सेंटर (SPGRC) येथे सुरू केले आहे. हे केंद्र बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. ह्या केंद्राचे उद्घाटन चंदा जाधव, सहआयुक्त, BMC आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे महिला, लहान मुलं आणि विविध समुदायांसाठी सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात मोफत समुपदेशन, तांत्रिक व कायदेशीर मार्गदर्शन आणि तक्रार नोंदवण्यास मदत करणे.
या कार्यक्रमास स्नेहा खांडेकर, जेंडर डायव्हर्सिटी व इन्क्लुजन सल्लागार, SPGRC सदस्य; वर्षा तावडे, राष्ट्रीय सचिव, भारतीय स्त्री शक्ती आणि अशोक पानवलकर, ज्येष्ठ पत्रकार व माजी संपादक, महाराष्ट्र टाइम्स यांची उपस्थिती लाभली. सर्वांसाठी सुरक्षित, समावेशक आणि सशक्त डिजिटल अवकाश निर्माण करण्याच्या वाटचालीत हे ही एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
एकाच माणसाला मारू, जो लाखाच्या बरोबरीचा असेल; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पाकिस्तानला धमकी